आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांनी पाहावेत म्हणून चित्रपट बनतात, वादासाठी नाही: मधूर भांडारकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- लोकांनी पाहावे म्हणून चित्रपट बनविले जातात. चित्रपट चालावा म्हणून वाद असा काही ट्रंेड नाही. कॉर्पोरेट, पेज थ्री, फॅशन आदी चित्रपटातून सत्य दाखविले, ट्रॉफिक सिग्नलमध्ये तर रोडवरील वास्तव मांडले. चांदणी बारमध्ये असाच प्रयोग केेला. मी सत्य दाखविणार, अर्थात यातून खूप वादही होतात. हिरॉईन चित्रपटावेळीही खूप वाद झाला. स्वत: इंडस्ट्रीजमध्ये राहून तुम्ही इंडस्ट्रीजच्या पडद्यामागील घटना समोर आणल्या... अर्थात वादाची भीती असतेच. बहुतांश वेळा निराशेला सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी युवकांनी कमीत कमी पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन या क्षेत्रात यावे. आत्मविश्वासाने काम करावे, असे सिने दिग्दर्शक मधुर भांडारकर म्हणाले. 


'प्रिसिजन'च्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त 'दिव्य मराठी' कार्यालयात झालेल्या वार्तालापात ते बोलत होते. या वेळी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे माजी अधिष्ठाता समर नखाते, भागवत टॉकीजचे भरत भागवत, प्रिसिजनचे माधव देशपांडे, आदित्य गाडगीळ आदी उपस्थित होते. 


'युवा पिढी फेस्टिव्हलच्या माध्यमातून कनेक्ट होतेय' 
श्री. भांडारकर म्हणाले, '८० - ९० च्या दशकात मराठी चित्रपट मसालापट होते. मात्र आता हे चित्रपट उच्च प्रतीचे बनत आहेत. श्वास चित्रपटापासून मराठी चित्रपटांचे वेगळेपण उठून दिसते आहे. युवा पिढी फेस्टिव्हलच्या माध्यमातून कनेक्ट होत असते. बॉलीवूडमधील अनेक सितारे या फेस्टिव्हलच्या निमित्ताने येतील. आयडिया टू स्क्रीन असा चित्रपटाचा जो प्रवास असतो, लोक म्हणतात की, फिल्म मेकर नाही तर जर्नलिस्ट आहे. काहीजण ब्लॉग लिहितात, काही पुस्तके. काही जण डॉक्युमेंट्री बनविता, मधुर चित्रपट बनवितात. याचे कारण मी कोणताही चित्रपट करताना त्यासाठी संशोधन करतो. त्यानंतरच तो लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो.' 


रिअलिस्टीक चित्रपट बनवताना तो डॉक्युमेंटरी सारखा न बनता, लोकांना आवडावा याकडे माझा कल असतो. अशा कलाकृती या माणसांच्या भावनांना जागे ठेवतात. चित्रपटात भूमिका देण्यासाठी ऑडिशन न घेता, कलाकारांना निवडण्यास मी प्राधान्य देतो. पेज थ्रीमध्ये पत्रकाराची भूमिका सोलापूरच्या अतुल कुलकर्णी यांनी केली. हे राम हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना या भूमिकेसाठी मी निवडले, असे श्री. भांडारकर यांनी सांगितले. 


'रमेशचंद्रजी अग्रवाल मला वडिलांसमान' 
मधुर भांडारकर यांची प्रेस कॉन्फरन्स आज सकाळी दिव्य मराठीच्या कार्यालयात झाली. कॉन्फरन्स रुममधील दैनिक भास्कर ग्रुपचे दिवंगत चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांचे छायाचित्र पाहिल्यानंतर भांडारकर यांनी त्यांच्या विषयीच्या स्मृतींना उजाळा देत ते म्हणाले, रमेशचंद्रजी हे मला वडिलांसमान होते. गिरीष अग्रवाल हे ही माझे चांगले जवळचे मित्र आहेत. दैनिक ग्रुपशी माझे अनेक वर्षांपासून जवळचे संबंध आहेत. रमेशचंद्रजी यांच्या छायाचित्रासोबत त्यांनी स्वत:फोटा काढून घेत क्षण मधुरजी यांनी संग्रहीत केला.