आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीतील विद्यार्थ्याचा खून प्रेमप्रकरणातून, दाेघे ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नातेपुते (जि. सोलापूर)- प्रेमप्रकरणातूनच दहावीतील मित्राचा वर्गमित्रांनी खून केल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. या प्रकरणातील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महेश कारंडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव होते. दरम्यान,  एका मुलीवरील एकतर्फी प्रेमातून महेश हा सतत आम्हाला त्रास द्यायचा. त्यानेच लपवलेल्या कोयत्याने त्याचा खून केल्याची कबुली दोन अल्पवयीन मुलांनी दिली.  

 

मंगळवारी (दि. ६) सकाळी साडेअकराच्या सुमारास पिरळे (ता. माळशिरस) विद्यालयातील संगणक कक्षात संशयितांनी वर्गमित्र महेश कारंडे याचा लोखंड गज व कोयत्याने वार करून खून केला. नंतर दोघांनी कक्षाला कडी लावून कुलूप नुसते अडकवून दुचाकीने दहिगावच्या दिशेने पोबारा केला. दहिगावात गाडी ठेवून ते बारामतीला गेले होते.   नातेपुते  पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर होते. संशयित बारामती येथील त्यांच्या नातेवाइकाच्या घरी गेले होते. पोलिस पोहोचण्याआधी त्यांनी तेथून पलायन केले. पोलिसांनी संशयितांच्या वडिलांसह  नातेवाइकांच्या मदतीने पहाटे नीरा वाघज येथून त्यांना  ताब्यात घेतले.   


संशयितांना आता पश्चात्ताप
सात दिवसांपूर्वी महेश याने प्रेमप्रकरणातून संशयिताला मारहाण केली होती. त्याने आपल्या वडिलांनाही याची माहिती दिली होती. तो नेहमीच संशयितांना  दमबाजी करायचा. ते अभ्यासासाठी रात्री शाळेच्या जायचे. त्याच्याशी संशयितांचे चांगले संबंध होते. मात्र, घटनेदिवशी त्याने दोघांना प्रेमप्रकरणाबाबत  बोलण्यासाठी संगणक खोलीत बोलावले. कक्षात गेल्यावर तेथे शिक्षक दहावीचे पेपर घेण्यासाठी आले होते. नंतर आलेल्या महेशने त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे संशयित मुलांनी  त्याच्याच कोयत्याने खून करून पलायन केले. दरम्यान, आता आपल्याला पश्चात्ताप होत असल्याचे दोन संशयितांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...