आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैसर्गिक भाजीपाला, धान्य विक्रीसाठी शहरात फिरतेय व्हॅन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- नैसर्गिक भाजीपाला आणि धान्याची मोबाइल व्हॅन शहराच्या विविध भागात गेल्या तीन महिन्यांपासून फिरत आहे. विषमुक्त अन्नाकडे शहरवासीयांचा कल वाढला आहे. त्यामुळे या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिरपनहळ्ळी येथील शेतकरी सिद्धाराम मगे यांनी सेंद्रिय शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या गटाकडून सेंद्रीय शेतमाल एकत्र करून हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी गोसेवा समितीचे शिवानंद कल्लूरकर यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे मगे यांनी सांगितले. 


सेंद्रीय शेतीमालाच्या फिरत्या केंद्राला शेतमाल उपलब्ध करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते विषमुक्त सेंद्रीय शेती करणारे शेतकरी शशिकांत पुदे, हिरगप्पा कुंभार, भीमराव सुतार, राजेश काळजे, सिद्धाराम मगे, भाऊसाहेब भोसले, आप्पाशा महिमकर यांचा सत्कार करण्यात आला. नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या शेतीमाल विक्रीची फिरती गाडी सकाळी कुंभारवेस, टिळक परिसरात असते. दुपारी तीन नंतर सातरस्ता परिसरात असते, असे श्री. मगे यांनी सांगितले. 


बाळीवेस येथील कार्यक्रमास कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, महेश अंदेली, रमेश दुलंगे, पुरुषोत्तम बलदवा, अनिल दुलंगे, माणिकप्रभू शिंदे, नीलकंठ स्वामी, आेम डागा आदी उपस्थित होते. 


विषमुक्त अन्न हाच सर्वोत्तम पर्याय 
विषमुक्त अन्न पिकवणारा शेतकरी मालाच्या विक्रीसाठी ग्राहकांचा शोध घेत आहे. रासायनिक खत, कीटकनाशक यांच्या वाईट परिणामांची जाणीव असणारे ग्राहक सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या उत्पादित मालाचा शोध घेत आहेत. विषारी घटकांचा समावेश असलेले अन्नपदार्थ खाऊन रुग्णालयाची भरती करण्यापेक्षा विषमुक्त अन्न हा सर्वोत्तम पर्याय आहे, असे विचार पालकमंत्री देशमुख यांनी या प्रसंगी व्यक्त केले. 

बातम्या आणखी आहेत...