आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा निवडणूक लक्ष्याने वेधले कार्यकर्त्यांकडे काँग्रेस, भाजपचे लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पक्ष वेगवेगळे असले तरी एकोप्याने काम करून विकास साधता येतो. राजकीय काम फक्त निवडणुका जिंकून आल्याने संपत नाही, सामाजातील सामान्य लाेकांची ही सेवा करावी लागते. छोटी मने देखील मोठी मने जोडू शकतात. त्यामुळे चार लोकांमध्ये परिवर्तन घडण्यास मदत होते. मात्र निवडणुकीनंतर समाज अथवा   लोकांशी असलेली नाळ तोडल्यास विपरीत परिणामास सामोरे जावे लागते, त्याचा परिणाम इंदिरा गांधी यांच्या सरकारला सत्तेच्या बाहेर जावे लागले होते. असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 

 

माहेश्वरी मंगल कार्यालयात पालकमंत्री देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार अमर साबळे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, संघटनमंत्री विजय पुराणिक, महापाैर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तूल, संजय कोळी, उमा खापरे आदी उपस्थित होते. 


पुढे बोलताना महसूलमंत्री पाटील म्हणाले की प्रत्येकांनी सकारात्मक विचार करून प्रामाणिक काम करण्यावर भर द्यावा. सामान्य व्यक्तींना सरकारी अथवा खासगीमधून जास्तीत जास्त सेवा-सुविधा देण्यावर भर दिला पाहिजे. समाजाचा विश्वास जतन करावा. तसेच जुन्या कार्यकर्त्यांनी नकारात्मक वृत्ती काढून टाकावी, तर नव्याने लोकसंपर्क वाढवण्यावर भर द्यावा. अर्धा तासाच्या कालावधीमध्ये कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला महसूलमंत्री यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमास नगरसेवक किरण देशमुख, सुजाता काकडे, विक्रम देशमुख, नरेंद्र काळे, राजकुमार पाटील, सचिन कुलकर्णी, महांतेश झंेडेकर, बिज्जू प्रधाने, राजा आलुरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 


मेळाव्यात क्रिकेट 
कार्यकर्ता संवाद मेळावा सात वाजता सुरू हाेणार होता, मात्र महसूलमंत्री एका खासगी कार्यक्रमाला गेल्याने मेळाव्यास दोन तासाचा विलंब झाला. त्यामुळे ३० मिनिटातच संवाद मेळावा कार्यक्रम उरकला. डिस्प्ले बोर्डवर लाईव्ह क्रिकेट सामना असल्याने कार्यकर्त्यांनी मॅच पाहण्यासाठी गर्दी केली होती. 


सेनेची साथ सोडणार नाही 
राज्यात प्रमुख चार राजकीय पक्ष आहेत, शिवसेना अथवा भारतीय जनता पार्टीमध्ये काही मतभेद असे तरी विचार एकच आहेत. अनेक वर्षापासून एकत्र अाहोत, मतभेद झाले म्हणून काँग्रेस अथवा राष्ट्रवादीबरोबर युती होणार नाही. शिवसेना कसेही वागले तरी चालेल. आम्ही त्रास देणार नाही, त्रास दिला तर सोडणार नाही, असे प्रतिपादन महसूलमंत्री पाटील यांनी केले. 
काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे, तर भ्रष्ट भाजप नेत्यांना क्लीन चिट 


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप, घणाघाती टीका 
पुण्यतिथीनिमित्त पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन करताना ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, मधुकर भावे अादी. काँग्रेसच्या माजी आमदारांवर, नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, तर भ्रष्टाचार केलेल्या भाजपच्या नेत्यांना मात्र क्लीन चिट दिली जात आहे. गेल्या चार वर्षात मोदी सरकारने सर्व भारतीयांची दिशाभूल केली. काँग्रेसच देशात अच्छे दिन आणू शकते, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. 


शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे भवानी पेठेतील रेवम्मा पाटील कार्यालयात रविवारी दुपारी व्हीजन २०१९ अंतर्गत काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर झाले. त्यावेळी ते बोलत होते.काँग्रेसने केलेल्या विकासकामांची माहिती सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी केले. 


भाजपचे अंध, मुके नि बहिरे सरकार : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, भाजप सरकार म्हणजे आंधळे, मुके आणि बहिरे सरकार आहे. जनतेची हाक त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, शेतकऱ्यांची आत्महत्या त्यांना दिसत नाही, जनतेचे त्रास पाहून सुद्धा या सरकारला काय वाटत नाही. 


खोट्याविरुद्ध खऱ्याची लढाई : ही लढाई भाजपविरुद्ध काँग्रेस नसून खोटे बोलणारे, देशाला बरबाद करणाऱ्याविरुद्ध, आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशाच्या अखंडतेसाठी, धर्मनिरपेक्षतेसाठी पेटून उठण्याची गरज आहे. हिंदुत्ववादी मुद्दा घेऊन नेहमी राजकारण करणाऱ्या भाजपने हिंदू धर्माचा घोर अपमान केला आहे. योगी मुख्यमंत्री झाले त्याच वेळी हिंदुत्वाचा घोर अपमान झाला. जे व्यक्ती दंगल घडवण्याची भाषा करतात, धार्मिक स्थळ पाडण्याची भाषा करतात त्यांच्या मनात देशप्रेम कधीच असणार नाही. 


काँग्रेसच्या प्रकल्पांचे मोदींकडून उद््घाटन 
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, की आमच्या संरक्षणाची जबाबदारी कायद्यात आहे, त्या कायद्याची घटना बदलण्याची भाषा भाजप करत आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या विविध योजनांचे उद््घाटन करण्यात भाजप स्वतःला धन्य मानत आहे. 


काँग्रेसच्या शिबिरात 'पतंजली'चे पाणी 
दुपारी चारचा कार्यक्रम सव्वा सहा वाजता सुरू झाला. तरी कार्यकर्त्यांची गर्दी कायम होती. मात्र रोजा सोडण्याची वेळ आली म्हणून काही मुस्लिम महिला निघून गेल्या. काँग्रेसच्या कार्यक्रमात पतंजली कंपनीच्या पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या. यावेळी मंचावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मधुकर भावे, शरद रणपिसे, मोहन जोशी, माणिकराव ठाकरे यांच्यासह शहराध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक चेतन नरोटे, रियाज हुंडेकरी, फिरदोस पटेल, बाबा करगुळे आदी होते. 

बातम्या आणखी आहेत...