आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष दाखवून दुष्कर्म; तरुणाविरुद्ध गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अभियांत्रिकी कॉलेजमध्ये असताना गॅदरिंगमध्ये झालेल्या ओळखीचा फायदा घेत, प्रेमसंबंधाचा बहाणा करीत, लग्नाच्या आमिषाला बळी पडत एका तरुणीवर युवकाने आठ वर्षांपासून दुष्कर्म केल्याची घटना घडली. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादेवरून प्रवीणकुमार मल्लप्पा पुजारी (रा. इंडी , जि. विजापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

 

फिर्यादेत म्हटले आहे   की, सुरवातीला मेसेज, नंतर एकतर्फी प्रेम असल्याचे वारंवार सांगत तरुणीला जबरदस्तीने पुणे येथील हिंजवडी येथे नेले. 'तुझे फोटो आहेत,' असे सांगून धमकावले, इंटरनेटवर टाकण्याची धमकीही दिली व दुष्कर्म केले. २०१० पासून हा प्रकार सुरू होता. सप्टेंबर २०१५ मध्ये तरुणी गर्भवती राहिली. जबरदस्तीने गर्भपात करावयास लावला. लग्नाबाबत वारंवार विचारणा केल्यानंतर प्रवीणकुमारच्या आईने विरोध दर्शविला. 'तू हलक्या जातीची आहेस, माझ्या मुलाच्या लायकीची नाहीस, तू खुश ठेवू शकणार नाहीस,' असे सांगून घराबाहेर हाकलून दिले. 


या घटनेनंतर प्रवीणकुमारने न्यूझीलंड येथे जाण्यासाठी २६ लाख रुपये देण्यासाठी तगादा लावला. एप्रिल २०१८ मध्ये आरोपी प्रवीणकुमार आणि दुसरी एक तरुणी त्यांच्या घरात आढळली. त्याची विचारणा केल्यानंतर प्रवीणकुमारने व त्या युवतीने त्यास लाथाबुक्क्याने मारहाण केल्याचेही त्यात म्हटले आहे. 

बातम्या आणखी आहेत...