आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्याविरोधात उमेदवार दिला म्हणून मी 'सिद्धेश्वर'सोबत; पालकमंत्री देशमुख यांचे स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- निवडणूक जाहीर झाल्यानंतर मी स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. तरीही आमच्या लोकांनी माझ्याविरोधात कुंभारी गणामध्ये उमेदवार दिला. यामुळेच मी सिद्धेश्वर पॅनलसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले.

 
हत्तूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे ग्रामदैवत सोमेश्वर-बनसिद्धेश्वर मंदिर येथे श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शेतकरी व व्यापारी यांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी निवडणुकीस उभा आहे. मी सलग तीन वेळा ज्यांच्या विश्वासावर, मतदानावर आमदार झालो, त्या बाजार समितीमधील व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडविले जात नाहीत. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले. यानंतर विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, ज्योत्याप्पा सिनेवडीयार, भुताळी कळकीळे, शिवानंद आंदोडगी, चंद्रशेखर भरले यांनी मनोगत व्यक्त केले. 


यावेळी जिल्हा परिषद पक्षनेते आनंद तानवडे, श्रीशैल हत्तुरे, दत्ता तानवडे, माजी नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे, सुधीर थोबडे, महेश हिंडोळे, अप्पासाहेब बिराजदार, सोमनाथ मेंगाणे, तुकाराम बिराजदार, आनंद मुस्तारे, नगरसेवक डाॅ. किरण देशमुख, शिवानंद पाटील, अमर पुदाले, नागेश भोगडे, गजानन होनराव, सुरेश ताकमोगे, सागर तेली, जगन्नाथ गायकवाड, शिवानंद वरशेट्टी, हत्तूरचे सरपंच धर्मराज राठोड, विजय बिराजदार, अप्पासाहेब मोटे, शिवानंद पुजारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. रावसाहेब व्हनमाने यांनी प्रास्ताविक केले. अण्णाप्पा सतूबर यांनी सुत्रसंचालन केले.

 

सिद्धरामेश्वर पॅनलच्या प्रचाराचा आज शुभारंभ 
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सिद्धरामेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी (दि.२२) सकाळी १० वाजता हत्तूर येथील सोमेश्वर मंदिरातून करण्यात येणार आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख व पाशा पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. 


बाजार समिती अपहार प्रकरण, माफीचा अर्ज केला नामंजूर 
बाजार समिती अपहार प्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आरोपींना हजर न राहता माफीचा अर्ज सादर केला होता. ताे अर्ज न्यायालयाने आज नामंजूर केला. तसेच जामीन अर्जावरील सुनावणीकरिता उद्या २२ जूनची तारीख देण्यात आली. बाजार समिती अपहार प्रकरणी सतरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी यांना न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले होते. या सतरा जणांनी यापूर्वी दोनवेळा गैरहजेरीचा माफी अर्ज सादर केला होता. न्यायालयाने यांचा तो अर्ज मंजूर केला होता. आज गुरुवारी तिसरा गैरहजेरीचा माफी अर्ज सादर करण्यात आला होता. तेव्हा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यू. बी. हेजीब यांनी तो अर्ज नामंजूर केला. 

बातम्या आणखी आहेत...