आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्कर्म : तरुणाला दहा वर्षांची शिक्षा, अल्पवयीनवर दुष्कर्माची २ वर्षापूर्वीची घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म करणाऱ्या तरुणाला प्रथम जलदगती न्यायाधीश आर.व्ही. सावंत-वाघुले यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. जावेद सलीम पठाण (वय २३, रा. कुंचीकोरवी गल्ली) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. 

 

शिवण क्लासला जाते म्हणून एक अल्पवयीन मुलगी १२ जानेवारी २०१६ रोजी घराबाहेर पडली होती. तेव्हा आरोपी जावेद याने तिला धमकी देऊन मोटारसायकलवर जबरदस्तीने बसविले. त्यानंतर मुलीला विडी घरकुल येथील मित्राच्या घरी नेऊन दुष्कर्म केले. याप्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले. या खटल्यात आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित मुलीची साक्ष महत्त्वपूर्ण विश्वासार्ह ठरली. त्याचबरोबर पीडित मुलीचे वडील, पंच साक्षीदार प्रीतम कोरडे, सरोजा भंडारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. हसीना यांची सुध्दा साक्ष महत्त्वपूर्व ठरली. 
या प्रकरणी सरकार अॅड. वामनराव कुलकर्णी, आरोपीकडून अॅड. श्रीकांत गडदे यांनी काम पाहिले. 

 

डॉक्टरांनी दिलेला अहवाल महत्वपूर्ण 
डॉक्टरांनी दिलेला अहवालही महत्त्वाचा ठरला. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर दुष्कर्म केल्याचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. 

 

 

बातम्या आणखी आहेत...