आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अाधी परवानगी नाकारलेल्या दारू दुकानास जिल्हाधिकाऱ्यांचे अभय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महामार्गावरील गुजराल पेट्राेल पंपानजीक शाळेच्या इमारतीमधील वादग्रस्त एन.एन.वाइन्स या दारू दुकानाला पूर्वाश्रमीच्या जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर सन २०१४ मध्ये राज्यमंत्र्यांनी दुकानास अंशत: मान्यता देऊन तात्पुरता दिलासा दिला होता.सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतची दारू दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर हे वादग्रस्त दुकान काही दिवस बंद होते. परंतु शहरासाठी न्यायालयाने निर्णयामध्ये बदल केल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी परवाना नूतनीकरण करताना विद्यमान राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अभिप्राय न घेता आपल्या अधिकारात वादग्रस्त दारू दुकानाला अभय दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. समाज स्वास्थ्य बिघडवणाऱ्या अशा गंभीर विषयांकडे जिल्हाधिकारी लक्ष देत नसतील तर सामान्य माणसाने कुणाकडे दाद मागायची, असा सवाल आता परिसरातील नागरिक करीत आहेत. 

 

शहरातील पाेलनपेठ भागात सुगनचंद पारेख यांच्यानावे असलेल्या न्यू विजय ब्रॅण्डी हाऊस या दारूच्या दुकानाचे अधिकारपत्र परियल फेरूमल ताेलाणी यांच्या नावे देण्यात अाले अाहे.

 

आपल्या अधिकाराबाबत जिल्हाधिकारीच अनभिज्ञ 
शाळेच्या इमारतीमधील दारू दुकानासंदर्भात वादग्रस्त इमारतीला भेट देऊन कारवाई करण्याचे आश्वासन यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. 'दिव्य मराठी' प्रतिनिधींंनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. या कारवाईसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना छेडले असता ते म्हणाले, शाळेच्या इमारतीमध्ये असलेले दारूचे दुकान मी तक्रार अाली त्याच दिवशी बंद करू शकलाे असताे, परंतु संबंधित दारू दुकानाला तत्कालीन राज्यमंत्र्यांनी अंशत: मान्यता दिलेली असल्याने परवाना रद्द करण्याचे अधिकार मला नाहीत,अशा शब्दात हतबलता दर्शवून नागरिकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने मी वरिष्ठांकडे अहवाल पाठवेल, असे ते म्हणाले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस. एल. अाढाव यांच्याशी फाेनवर संपर्क केला आणि या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार अाहेत का? अशी विचारणा आढाव यांना केली. त्यामुळे आपल्या अधिकाराबाबत जिल्हाधिकारीच अनभिज्ञ आहेत की काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. 


चाैकशीचे अाश्वासन देऊन घूमजाव 
शाळेच्या इमारतीमधील दारू दुकानाबाबत नागरिकांच्या गंभीर तक्रारी आल्या अाहेत. त्यामुळे महिला, मुले यांच्या दृष्टीने कायदा अाणि सुव्यवस्था धाेक्यात अाल्याच्या गंभीर लेखी तक्रारी असतानादेखील जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केले अाहे. तसेच यासंदर्भात तक्रार करणाऱ्या नागरिकांना प्रत्यक्ष दुकानास भेट देऊन चाैकशीचे अाश्वासन देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक घूमजाव केले अाहे. कायदा अाणि सुव्यवस्थेसंदर्भात विशेषाधिकार असताना जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी शाळेच्या इमारतीमधील दारू दुकान बंद करण्यास हतबलता दाखवली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...