आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरचा भुईकोट आपल्या वैभवासह स्मार्ट होण्याच्या मार्गावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापुरातील भुईकोट हाही स्मार्ट होण्याच्या मार्गावर आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध सोयी-सुविधा करण्यात येत आहेत. धूळखात पडलेला ऐतिहासिक ठेवाही दर्शनी भागात आणून ठेवला जात आहे. किल्ल्याच्या आधीपासूनचे कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर, तसेच आदिलशहा, निझामशहा, देवगिरीचे यादव, हसन गंगू बहामनी, मराठेशाही व ब्रिटीश काळ असे विविध साम्राज्य पाहिलेला हा किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या मोलाचा आहे. अशा या वारशाकडे आता मागील काही महिन्यांपासून पुरातत्त्व विभागाकडून सोयी-सुविधा केल्या आहेत. 

 

१४ मे १८१८ रोजी झालेली घटना : १३ मे १८१८ ला ब्रिटिशांनी किल्ल्यानजीक तोफा उभ्या करून तेथून दिवाळी-तोड म्हणजे गडाचे तट पाडणाऱ्या तोफांचा भडिमार आपल्या याच किल्ल्यावर सुरू केला. किल्ल्याला खिंडार पडले. मराठ्यांनी त्यांना अडवून धरण्याचा प्रयत्न केला. परंतु यश आले नाही. इंग्रजांनी तटाला शिड्या लावून किल्ल्यात उतरण्याची तयारी केली. इंग्रजांना आपण रोखू शकत नाही हे पाहताच दुसऱ्या दिवशी किल्लेदार विसाजी देवराव याने इंग्रजांकडे तहासाठी माणसे पाठवली. १४ मे ला इंग्रज व मराठे यांच्यात पाच कलमी तह झाला. या तहानुसार दुसऱ्या दिवशी किल्ल्यातील सर्व मराठी आपापले सामान घेऊन किल्ल्यातून बाहेर निघून गेले व सोलापूरचा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. 


भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी करण्यात येत आहेत विविध सोयी-सुविधा, परिसरात विखरून पडलेले ऐतिहासिक अवशेष दर्शनी भागात 
सोलापूरच्या किल्ल्यामध्ये पुरातत्त्व आणि इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असे अनेक अवशेष इकडे तिकडे पडलेले आहेत. वीरगळ, द्वारपाल, शिलालेख दर्शनी भागात ठेवणे सुरू आहे. 


नागबावडी परिसरातून होणारा प्रवेश बंद 
भुईकोट किल्ल्यातील पहारेकऱ्यांच्या खोलीत असलेल्या शिलालेख, द्वारपाल, वीरगळ अशा विविध मूर्ती अनेक वर्षांपासून तशाच पडून होत्या. त्या सर्व एकत्र करून तिसऱ्या प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या श्री महाकालेश्वर व शनीश्वर मंदिराच्या जवळ व्यवस्थित दिसतील अशा स्वरूपात ठेवण्यात आलेले आहेत. नागबावडी येथील पाण्याचा वापर करून किल्ल्याच्या आतील परिसर हिरवागार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पर्यटकांची तहान भागवण्यासाठी प्रवेशद्वाराजवळच थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नागबावडी परिसरातून किल्ल्यात होणारा अनधिकृत प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आलेला असून केवळ एकच प्रवेशद्वार सुरू ठेवण्यात आलेले आहे. हरीष दासरे, भारतीय पुरातत्त्व विभाग अधिकारी 

बातम्या आणखी आहेत...