आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्ष उलटले तरी किती कामे सुरू, झोन अधिकाऱ्यांना येईना सांगता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर -  महापालिका अंदाजपत्रक अाढावा बैठकीत २०१७-१८ या वर्षात नगरसेवकांनी सुचवलेली नेमकी किती विकासकामे सुरू झाली व किती सुरूच झाली नाहीत, यासंदर्भात झोन अधिकाऱ्यांकडे पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचे समोर अाले आहे. पहिल्याच वर्षी नगरसेवकांनी अापापल्या प्रभागातील २६.३९ कोटींची ९५२ कामे सुचवली अाहेत. यापूर्वीही कामे सुरू करण्याचे अादेश दिले, तरी कामे का सुरू झाली नाहीत, यावरून महापौर शोभा बनशेट्टी व सभागृह नेते संजय कोळी यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. 

महापौर बनशेट्टी आणि सभागृह नेते कोळी यांनी बुधवारी बजेट आढावा बैठक बोलावली होती. या वेळी उपमहापौर शशिकला बत्तुल, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, झोन अधिकारी व संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते. अाढावा बैठकीत अधिकारी विकासकामांबाबत अडचणींचाच पाढा एेकवत असल्याने पदाधिकाऱ्यांनी झोन अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचे सांगितले. सत्ताधाऱ्यात दोन गट असल्याने प्रशासनाचे फावत होते. अाता दोन्ही गटाचे नेते बैठकीस होते. त्यामुळे अधिकारी अाता तरी पदाधिकाऱ्यांच्या अादेशावरून कार्यवाही करणार की नाही, असा सवाल अाहे. 

 

नगरसेवकांनी सुचवली २६ कोटींची कामे 

झोन नगरसेवकांनी कामांची टेंडर 
क्रमांक सुचवलेली कामे रक्कम प्रक्रिया 
१ १३४ ३ कोटी ५० लाख ८ 
२ १९५ ५ कोटी ६० लाख १५७ 
३ ९६ २ कोटी ४८ लाख ५१ 
४ ११३ ३ कोटी ३६ लाख ६ 
५ १४६ ५ कोटी २ लाख ११३ 
६ १०० २ कोटी ५० लाख ९५ 
७ १०३ २ कोटी ६९ लाख ७९ 
८ ६५ १ कोटी ६१ लाख ४५ 


मक्तेदारांची बैठक घेऊन सोडवणार समस्या 
स्थायी समिती सभापती निवडीचे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे यंदा महापालिकेचे आर्थिक बजेट लटकले नाही. येत्या चार दिवसांत सर्व पक्षाचे गटनेते, विरोधी पक्षनेते, पदाधिकारी यांची बैठक बोलावली जाणार आहे. मक्तेदारांची बैठकही घेणार आहे. मक्तेदारांच्या समस्या सोडवून काम कसे पुढे नेता येईल, यावर तोडगा काढण्यात येणार आहे, असे माहिती सभागृह नेते संजय कोळी यांनी दिली. आयुक्तांनीही कामे तातडीने करण्याची सूचना केली. 
९५२ कामे सुचवली, मक्तेदार नवीन घेण्यास तयार नसल्याची सबब 

 

विकासकामांना मुहूर्त मिळेना 
वर्ष उलटले तरी नागरी विकासाची नगरसेवकांनी सुचवलेली २५ टक्के कामे का झाली नाहीत. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे महापालिका आयुक्तांनी भांडवली कामांचा निधी पन्नास टक्याने कमी केला. गावठाण प्रभागातील नगरसेवकास ३० तर हद्दवाढ भागातील नगरसेवकांस ३५ लाखांचा निधी निश्चित केला. तरीही विकासकामांना मुहूर्त मिळत नाही.

बातम्या आणखी आहेत...