आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हद्दवाढच्या समतोल विकासास २३ कोटींचा मिळणार निधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील १०१४ एकरचा विकास होत आहे. शहरातील गावठाण भागासह विकासाचा समतोल हद्दवाढ भागातही करण्याचा प्रयत्न आहे. याकरिता शासनाकडून आलेल्या सुमारे २३ कोटी रुपयांचा निधी त्या भागात वापरला जाणार अाहे. त्यात प्राधान्याने पाणीपुरवठा व रस्ते याकडे लक्ष देण्यात येणार आहे. शिवाय शहरातील वाहतूक सेवा सुरळीत करण्यासाठी ५४ मीटर रस्ता करण्यात येत आहे. त्यासाठी अवंतीनगर रेल्वे रूळाजवळ भुयारी मार्गास शासनाने तत्वत: मंजुरी दिली आहे. नगरोत्थान योजनेतून शहरात करण्यात येणाऱ्या रस्त्याची रूंदी कमी करण्याचा विचार आहे. त्यालाही शासनाने तत्वत: मान्यता दिल्याचे पत्र महापालिकेस प्राप्त झाले आहे. 

 

शिवाजी चौकातील वाहतूक कमी करण्यासाठी जुना पुणे नाकामार्गे ५४ मीटर रस्ता करण्यात येत आहे. त्या मार्गावरील अवंतीनगर येथील रेल्वे रूळाजवळ भुयारी मार्ग करण्यास शासनाने तत्वत: मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे शिवाजी चौकातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. पुणे नाका ते अवंती नगर ते मंगळवेढा रोड ते सलगरवस्ती ते सोरेगाव पर्यंत सुमारे सहा किमीचा रस्ता असून, त्यासाठी काही भागातील रस्ते महापालिकेने टीडीआर घेऊन ताब्यात घेतले आहेत. तर काही जागेवर अतिक्रमण आहे. २२ शेतकरी न्यायालयात धाव घेतल्याने तेथे रस्ते कामास स्थगिती मिळाली आहे. असे असताना अवंती नगर येथे भुयारी मार्ग करण्याबाबत महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव दिला होता. त्यासाठी १६ कोटींची मागणी केली होती. त्यास शासनाने तत्वत: मान्यता दिली आहे. याबाबत शासनाने अध्यादेश काढल्याची माहिती महापालिकेचे उपअभियंता संदीप कारंजे यांनी दिली. 


नगरोत्थान रस्त्याची रुंदी कमी करण्याबाबत निर्णय 
शहरातील नगरोत्थान रस्ते करण्यासाठी शासनाने २१२ कोटी रुपये मंजूर केले. त्यातून ४९ रस्ते करण्यात येत अाहेत. पहिल्या टप्प्यातील २१ रस्त्यापैकी ९ रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. सम्राट चौक ते कोंतम चौक, जिल्हा परिषद ते बलिदान चौकसह काही रस्त्याची रुंदी कमी आहे. आराखड्यात १८ मीटर असेल तर प्रत्यक्षात कमी आहे. त्यामुळे अनेक रस्ते अर्धवट आहेत. जितकी रुंदी आहे तितका रस्ता करण्याबाबत महापालिकेने शासनाकडे मागणी केली होती. त्यास शासनाने तत्वत: मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. 


शहरासह हद्दवाढ भागाचा समतोल विकास 
शहरात स्मार्ट सिटी योजनेतून कामे होत असल्याने, हद्दवाढ भागाच्या विकासावर परिणाम होऊ नये म्हणून महापालिकेने हद्दवाढ भागासाठी मिळालेल्या निधीतून काम करणार आहे. यात प्राधान्याने पाइपलाइन, रस्ते कामे आहेत. सोलापूर महापालिका हद्दीतील हद्दवाढ भागासाठी २३.९२ कोटी मिळाले आहेत. शहर आणि हद्दवाढ समतोल विकास करण्याचा प्रयत्न असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. 


 

बातम्या आणखी आहेत...