आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर, पुणे विद्यापीठाला ‘मेटा’ अंगीकारता येईल; प्रभारी कुलगुरू डाॅ. करमाळकर यांचा विश्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर आणि पुणे विद्यापीठांचा विचार केल्यास एकमेकांच्या उत्तम संकल्पना, योजनांची देवाणघेवाण होऊ शकेल. या मेटा युनिर्व्हसिटीज होऊ शकतील. एमआेयू (सामंजस्य करार) करून शैक्षणिक संकल्पनांना, संशोधनांना अधिक वाव देता येऊ शकेल. त्या दिशेने आगामी काळात प्रयत्न करू, अशी ग्वाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी रविवारी (दि. १०) येथे केले. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ रविवारी पूर्ण झाला. त्यामुळे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. करमाळकर यांनी सोलापूर विद्यापीठाचा प्रभारी कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. या वेळी ते बोलत होते. 


सोलापूर विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळेपर्यंत ते कामकाज पाहतील. या काळात पुणे विद्यापीठ आणि सोलापूर विद्यापीठ विविध शैक्षणिक संकल्पनांची देवाणघेवाण करीत उत्तम शैक्षणिक कार्य, विद्यार्थी केंद्रित संकल्पनांवर संयुक्त कार्य करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. डॉ. करमाळकर म्हणाले, विद्यापीठांनी संवादावर विश्वास ठेवला पाहिजे. विद्यार्थी-पालक, पालक-समाज, समाज-विद्यापीठ यांच्यातील संवाद वाढला पाहिजे. 


संवादानेच अनेक प्रश्न सुटू शकतात. अडचणी असतात. त्यातून मार्ग काढणे गरजेचे असते. सर्वच अडचणी सुटतात, असे नाही. पण संवादातून किमान विश्वास, प्रतिमा तरी वृद्धिंगत होते. शैक्षणिक गुणवत्तेबाबत सोलापूर विद्यापीठही मागे नाही. गुणवत्तेचा आणि विद्यापीठांच्या स्थापना वयाचा काही संबंध नाही. विद्यापीठातील शिक्षक, विद्यापीठातील विद्यार्थी यांची गुणवत्ता असावी. त्यातूनच विद्यापीठांची गुणवत्ता जोखली जाते. विद्यापीठाऐवजी विद्यार्थी मानांिकत असावेत. त्यातूनच विद्यापीठाची प्रतिमा उंचावेल. संशोधनाला, नव्या अध्यापन शास्त्राला चालना देत हे मानांकन उंचावू शकतो, असे ते म्हणाले. 


मेटायुनिव्हर्सिटी म्हणजे काय?
मेटाम्हणजे डाटा ऑफ डाटा. ही मूळात पाश्चात्त्य संकल्पना आहे. मेटा विद्यापीठ म्हणजे दोन, तीन विद्यापीठांनी आपापसातील सामंजस्य करारानुसार विद्यार्थ्यांना पूरक आवडीचे विषय घेण्याचे स्वातंत्र्य देणे. उदा. सोलापूर पुणे विद्यापीठात सामंजस्य करार झाल्यास पुण्यातून किंवा सोलापुरातून कोणत्याही आवडीच्या विषयाचे अध्ययन त्यास करण्याची मुभा मिळेल. त्या त्या विषयाचे क्रेडिट हस्तांतरण करता येईल. त्यास मेटा युनिव्हर्सिटीची पदवी मिळेल. ती कोणत्याही विद्यापीठाच्या पदवी अार्हतेशी समकक्ष असेल. 


तेकामकाज पाहतील. या काळात पुणे विद्यापीठ आणि सोलापूर विद्यापीठ विविध शैक्षणिक संकल्पनांची देवाणघेवाण करीत उत्तम शैक्षणिक कार्य, विद्यार्थी केंद्रित संकल्पनांवर संयुक्त कार्य करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. डॉ. करमाळकर म्हणाले, विद्यापीठांनी संवादावर विश्वास ठेवला पाहिजे. विद्यार्थी-पालक, पालक-समाज, समाज-विद्यापीठ यांच्यातील संवाद वाढला पाहिजे. संवादानेच अनेक प्रश्न सुटू शकतात. अडचणी असतात. त्यातून मार्ग काढणे गरजेचे असते. सर्वच अडचणी सुटतात, असे नाही. पण संवादातून किमान विश्वास, प्रतिमा तरी वृद्धिंगत होते. 


शैक्षणिक गुणवत्तेबाबत सोलापूर विद्यापीठही मागे नाही. गुणवत्तेचा आणि विद्यापीठांच्या स्थापना वयाचा काही संबंध नाही. विद्यापीठातील शिक्षक, विद्यापीठातील विद्यार्थी यांची गुणवत्ता असावी. त्यातूनच विद्यापीठांची गुणवत्ता जोखली जाते. विद्यापीठाऐवजी विद्यार्थी मानांिकत असावेत. त्यातूनच विद्यापीठाची प्रतिमा उंचावेल. संशोधनाला, नव्या अध्यापन शास्त्राला चालना देत हे मानांकन उंचावू शकतो, असे ते म्हणाले. 


मेटा युनिव्हर्सिटी म्हणजे काय ? 
मेटा म्हणजे डाटा ऑफ डाटा. ही मूळात पाश्चात्त्य संकल्पना आहे. मेटा विद्यापीठ म्हणजे दोन, तीन विद्यापीठांनी आपापसातील सामंजस्य करारानुसार विद्यार्थ्यांना पूरक आवडीचे विषय घेण्याचे स्वातंत्र्य देणे. उदा. सोलापूर पुणे विद्यापीठात सामंजस्य करार झाल्यास पुण्यातून किंवा सोलापुरातून कोणत्याही आवडीच्या विषयाचे अध्ययन त्यास करण्याची मुभा मिळेल. त्या त्या विषयाचे क्रेडिट हस्तांतरण करता येईल. त्यास मेटा युनिव्हर्सिटीची पदवी मिळेल. ती कोणत्याही विद्यापीठाच्या पदवी अार्हतेशी समकक्ष असेल. मात्र, यासाठी यूजीसी परवानगी अन्य प्रक्रियाही आहेत. सध्या दिल्ली विद्यापीठ जामिया मिलिया विद्यापीठ यांच्यात हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. 


कामाचे समाधान 
डॉ. मालदार म्हणाले, विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या काळात शैक्षणिक संकल्पना, विद्यार्थी केंद्रित सुविधा निर्माण करणास प्राधान्य देता आले. कामाचे समाधान आहे. यासाठी सर्व सोलापूरकर, विविध घटकांचे मोलाचे सहकार्यही लाभले. 

बातम्या आणखी आहेत...