आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वानकर यांना पालकमंत्री म्हणाले, मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर -  शिवसेनेचे नगरसेवक गणेश वानकर यांनी बुधवारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची भेट घेतली. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडणूक प्रक्रियेवर उच्च न्यायालयाच्या निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ नये, अशी विनंती वानकर यांनी केली. यावर 'पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील. मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही', असे उत्तर श्री. देशमुख यांनी त्यांना दिल्याचे सांगण्यात आले. 

 

वादी राजश्री कणके यांना सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी महिन्याची मुदत दिली. त्यामुळे पुढील प्रक्रिया थांबली आहे. अर्ज भरताना गोंधळ झाल्याने पुन्हा प्रक्रिया घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी पीठासन अधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांना दिला होता. त्यावर शिवसेनेचे वानकर यांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर न्यायालयाने निर्णय देत पहिली प्रक्रिया पूर्ण करा, असा आदेश दिला होता. 


सभापती निवड १५ जूननंतर 
स्थायी समिती सभापती निवड जूननंतर होण्याची शक्यता आहे. न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्यावर एक महिन्याने सभापती निवड प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. लेखी आदेश अद्याप नसल्याने भाजपच्या राजश्री कणके सर्वोच्च न्यायालयात गेल्या नाहीत. प्रक्रिया पाहता १० जूननंतर सभापती निवड प्रक्रिया होऊ शकेल. 

बातम्या आणखी आहेत...