आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'इसिस'मध्ये जाऊ इच्छिणाऱ्या मुलाला आईच रोखते तेव्हा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- येथील डॉ. माधुरी दबडे यांच्या आई मंदा देशमुख यांनी लिहिलेला 'तालीम' हा लघुपट रविवारी दाखवण्यात आला. 


चित्रपटाची कथा अशी
अल्पसंख्याक समूहातील आरिफच्या वडिलांचा दंगलीत मृत्यू होतो. ती जातीय दंगल असते. त्यात दुसऱ्या समूहाकडून वडलांचा खून झाल्याचे त्याला बाहेरील शक्ती सांगत असते. त्यामुळे आरिफ बेचैन होतो. आईशी नीट बोलत नाही. त्यामुळे आईही अस्वस्थ. एके दिवशी महाविद्यालयाच्या संगणक दालनात आरिफ बसलेला असतो. समोर संगणकावर काम करतानाच मोबाइलवर काही शोधतो, 'इसिसमध्ये कसे सामील व्हायचे...' हे वाक्य त्याच्या मोबाइलवर उमटताच तिथल्या शिक्षका आेरडतात. मोबाइल जप्त करतात. दुसऱ्या दिवशी प्राचार्य आईला बोलावून घेतात. हताश झालेल्या आई मान खाली घालून सांगतात, 'आम्ही जन्माला घातले हाच आमचा दोष...' वातावरण धीरगंभीर झालेले. तितक्यात आरिफ येतो. आई त्याला जाब विचारताच तो म्हणतो, "अम्मी, माझ्या बाबांचा खून करणारी हीच मंडळी... (शिक्षकांकडे बोट दाखवत). आई त्याच्या मुस्कटात दोन लगावते. अोरडून सांगते, "अरे, त्या दंगलीत तुझ्या अबूंचा अपघाती मृत्यू झाला. दंगलीत जखमी झालेल्या लोकांवर उपचार करताना, एका रुग्णाला रक्ताची गरज असते. बाहेर पडणे अवघड होते. त्या वेळी तुझे अब्बू स्कूटर घेऊन निघाले. एका वाहनाच्या धडकेत जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोघांनी रक्त दिले. ते होते हिंदू..." या वाक्यानंतर 'अब फैसला आपके हाथ' असे वाक्य येते. चित्रपट समाप्त. 


स्वत: डॉ. दबडे यांची निर्मिती असलेल्या या लघुपटाचे दिग्दर्शन पुण्याच्या ऋषी नरेंद्र यांनी केले. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी मान्यवरांची उपस्थिती होती. 


स्मिता तांबे यांनी आरिफच्या आईची भूमिका केली. त्या साेलापूरला येणार होत्या. परंतु शुभसंदेश देणारा व्हिडिआे पाठवला. ते पाहिल्यानंतर सभागृहात प्रकाश पडला. त्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी मते मांडली. डॉ. दबडे यांनी आभार मानले. 

बातम्या आणखी आहेत...