आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- दहशतवादी कृत्यांमध्ये मुस्लिम तरुणांची संख्या अधिक असली तरी अलीकडील काही घटना पाहता अशा कारवायांमध्ये इतर धर्मांतील तरुणांचा, संघटनांचा शिरकाव झाल्याचे दिसून अाले अाहे. सजग नागरिकांनी सतर्क राहून एटीएसला मदत करावी, असे अावाहन दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अपर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी केले.
इंटरनेट व विविध पद्धतीने भावना भडकावल्या जात अाहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा सायबर विभाग सक्षम करण्यासाठी ८५० काेटी खर्च केला जात असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. ‘काही उच्चशिक्षित व नाेकरी करत असलेल्या तरुणांचीही माथी भडकवली जात अाहेत. अाम्ही त्यांचे समुपदेशन करून मतपरिवर्तन केले. या मार्गावर जाण्यापासून ८६ तरुणांना राेखले. सर्व शहरांतील पोलिस आयुक्तांनी शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने सुरू केलेल्या योजनांतून तरुणांना रोजगार देणे, मतपरिवर्तन करणे अतिशय आवश्यक आहे,’ असे कुलकर्णी म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.