आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण रेल्वे किंवा काेचची अाॅनलाइन बुकिंग;अायअारसीटीसी संकेतस्थळावरच मिळेल सुविधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- लग्नसाेहळे ,भव्य कार्यक्रम, भारत दर्शन किंवा इतर कोणत्याही आध्यात्मिक कार्यक्रमासाठी प्रवाशांना अख्खी रेल्वे किंवा एखादा काेच बुक करण्यासाठी आता रेल्वे स्थानक व्यवस्थापकांकडे  खेटे मारण्याची गरज उरलेली नाही. कारण संपूर्ण रेल्वे अथवा डबे बुक करण्यासाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देत आहे. ई-तिकिटाप्रमाणेच ही सुविधा असेल.  


रेल्वे बोर्डाने नुकतेच एक परिपत्रक काढले अाहे. यात संपूर्ण रेल्वे, डबे व सलून (शाही डबे ) ऑनलाइन पद्धतीने प्रवाशांना लवकरच बुक करता येईल, असे म्हटले आहे. तशा सूचनादेखील आयआरसीटीसी कंपनीला देण्यात आल्या आहेत.  कोणतीही व्यक्ती अथवा व्यक्तिसमूह  एफटीआर (पूर्ण शुल्क) भरून संपूर्ण रेल्वे अाॅनलाइन बुक करू शकेल. त्यामुळे रेल्वे बुक करण्याच्या वेळखाऊपणाच्या प्रक्रियेपासून प्रवाशांची सुटका होऊन वेळ वाचणार आहे. हा नियम कधीपासून  लागू करायचा, तसेच किती दिवसांच्या आत बुकिंग करायचे हे मात्र अद्याप ठरलेले नाही. लवकरच याबाबतीत निर्णय घेतला जाणार अाहे. यावर सध्या काम सुरू असून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी हाेईल, अशी माहिती अायअारसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी  सिद्धार्थ सिंग यांनी दिली.  

 

सध्या कशी आहे पद्धत   

 

एखाद्या व्यक्तीला अथवा व्यक्तिसमूहाला रेल्वेचा डबा किंवा संपूर्ण रेल्वे बुक करायची असेल तर त्यांना ज्या स्थानकापासून प्रवासास सुरुवात करणार आहात तिथे संपर्क साधावा लागताे. या ठिकाणी कोठून कोठे प्रवास करणार आहात, प्रवासाची तारीख, परतीच्या प्रवासाची तारीख, प्रवास करणाऱ्यांची संख्या आदी माहिती एका अर्जात स्थानक व्यवस्थापकांकडे भरून द्यावी लागते. यानंतर प्रवासात रेल्वेगाडी किती िकलोमीटर धावेल याचा हिशेब मांडला जातो. त्यानुसार जे भाडे होईल, ती संपूर्ण रक्कम  मुख्य बुकिंग पर्यवेक्षक यांच्याकडे संबंधितांना भरावी लागते. त्याची पावती मिळते, ती पुन्हा स्थानक व्यवस्थापकांकडे द्यावी लागते. यानंतर विभागात कोणती रेल्वे अथवा किती डबे उपलब्ध आहेत, याचा शाेध घेऊन संबंधित प्रवाशास ते उपलब्ध करून देण्यात येते. मात्र या प्रक्रियेसाठी खूप वेळ खर्च हाेताे. ताे अाता अाॅनलाइन प्रक्रियेमुळे वाचू शकेल.

बातम्या आणखी आहेत...