आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अोटीपी क्रमांक विचारत अाॅनलाइन शाॅपिंग करून ५० हजारांना गंडवले; महिनाभरातील दुसरी घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ४६ हजारांची आॅनलाइन शाॅपिंग करून ओटीपी विचारून एकास गंडवल्याचा प्रकार पुढे आला आहे. बजाज फायनान्स कार्डवरून अाॅनलाइन शाॅपिंग करून ४६ हजार ९९९ रुपयांची खरेदी केली. त्यानंतर पाच हजार २२३ रुपयांचा हप्ता बँकेतून वळते करून घेऊन एकूण पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर अाले अाहे. 


शांतकुमार नागनाथ पुजारी (किसान संकुल, अक्कलकोट रोड) यांनी एमअायडीसी पोलिसात तक्रार दिली अाहे. १३ एप्रिल रोजी हा प्रकार घडला. १९ मे रोजी त्यांनी फिर्याद दिली. पुजारी यांना फोन अाला. मी बजाज फायनान्समधून बोलत अाहे. अापल्या मोबाइलवर अालेला अोटीपी नंबर सांगा, अापले कार्ड नूतनीकरण करायचे अाहे असे म्हणत ओटीपी घेतले. यानंतर प्लीपकार्डवरून अाॅनलाइन शाॅपिंग झाली. नंतर बँक अाॅफ इंडिया येथील खात्यातून खरेदीपोटी पहिला हप्ता म्हणून ५ हजार २२३ वळते झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पुजारी यांनी पोलिसात धाव घेतली. हवालदार लवटे तपास करीत अाहेत. 


नागरिकांनो, सावध राहा... फोनवरून माहिती देऊ नका : कुठलीही बँक, फायनान्स कंपनी फोनवरून एटीएम कोड, अोटीपी विचारत नाही. अापणास येणारे काॅल फसवे असतात. असे फोन अाल्यास खातरजमा करण्यासाठी बँकेत अथवा संबंिधत फायनान्स कंपनीत प्रत्यक्षात जाऊन चौकशी करा. 

बातम्या आणखी आहेत...