आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवयव दान : आयुष्यभरात दिले, मृत्यूनंतरही तिघांच्या आयुष्याला \'प्रकाश\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- घरापासून कोसो दूर, प्रत्येक वयोगटातील व्यक्तींशी मिसळून राहणारे, कधीच कोणताही गर्व न करणारे व स्वत: स्वयंपाक करून मित्रांना खायला घालणारे प्रकाश भागवत यांचा मेंदूमृत झाला. जिवंतपणी मदत करणाच्या स्वभावामुळे प्रत्येकांच्या हृदयात घर केले होते. मेंदूमृत झाल्यानंतरही लिव्हर व दोन डोळे दान केल्याने तिघांच्या आयुष्यात प्रकाश फुलणार आहे. 


ठाणे जिल्ह्यातील शहापूर (सध्या हिप्परगा येथे राहत होते) येथील प्रकाश काशिनाथ भागवत (वय ५४) हे आयआरबी कंपनीमध्ये सुपरवायझर या पदावर कार्यरत होते. सध्या सोलापूर - तुळजापूर रोडचे काम सुरू आहे. त्यावर ते कार्यरत होते. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास त्यांना झटका आल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांना तत्काळ यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करून मेंदू विकारतज्ज्ञ डॉ. अाशिष भुतडा यांच्या नियंत्रणाखाली उपचार सुरू करण्यात आले. मेंदूच्या अर्ध्या भागाला व्यवस्थित रक्त पुरवठा होत नसल्याने भागवत यांची प्रकृती गंभीर बनत होती. शेवटी तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांचा मेंदूमृत घोषित केले. त्यानंतर डॉ. भुतडा व इतर डॉक्टरांनी नातेवाइकांचे अवयव दान करण्याच्या दृष्टीने समुपदेशन केले. नातेवाईक अवदानासाठी तयार झाले. त्यानंतर पुणे झोनल ट्रान्सप्लांन्ट कमिटीस ब्रेनडेडची माहिती देण्यात आली. त्यानुसार कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. 


हृदय दान करण्यासाठी नॅशनल अलर्ट करण्यात आला. चेन्नई येथे हृदय नेण्याची तयारी करण्यात आली होती. परंतु रुग्णाची तब्येत व वाहतूक याचा ताळमेळ बसला नाही. तसेच किडन्याची गाळण क्षमताही व्यवस्थित नव्हती. त्यामुळे किडन्याही दान केल्या नाहीत. फक्त लिव्हर व डोळे दान केले. लिव्हर पुणे येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल आणि डोळे सोलापूरला सिव्हिल हॉस्पिटलला देण्यात आले. 


अवयव दान प्रक्रिया यशोधरा हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. बसवराज कोलूर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. डॉ. विजय शिवपूजे, डॉ. अाशिष भुतडा, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. राहुल स्वामी, डॉ. एस. बाँबेवाले, प्रशासकीय अधिकारी विजय चंद्रा यांच्यासह पुण्याच्या टीममधील डॉ. जुनेद व डॉ. अाशिष अंधारे, डॉ. विनायक निकम अादींनी योगदान दिले. 


पोलिसांची दिरंगाई 
मेंदूमृत भागवत यांचे शव विच्छेदन करण्यासाठी सिव्हिलमध्ये दुपारी नेले. पंचनामा करण्यासाठी पोलिस फिरकलेच नाहीत. सायंकाळी पाचनंतर पंचनामा झाला. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ठाणे येथे न्यायचा होता. नातेवाईकांनी अवयव दान करून सामाजिक बांधिलकी जपली पण पोलिसांच्या नाकर्तेपणाचा त्यांना अनुभव आला. मृतदेह चार ते पाच तास पंचनाम्याविना होता. पाचनंतर ४० मिनिटात शवविच्छेदन झाले. मग नातेवाईक मृतदेहासह रवाना झाले. 

बातम्या आणखी आहेत...