आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंग गायब करणाऱ्यांचा वापर परवाना रद्द करून दंड वसुली; आयुक्त डॉ. ढाकणे यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अनधिकृत बांधकाम करून पार्किंग गायब करणाऱ्या बांधकामाचे पाडकाम महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना कारवाईची भीती वाटत नाही. यापुढे अनधिकृत बांधकाम पाडकाम केल्यावर त्यांच्याकडून दंडासह रक्कम वसूल करण्यात येणार आहे. नोटीस देण्याचे काम सुरूच असल्याची माहिती महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी दिली. 


पार्किंगची जागा बळकावून तेथे वाणिज्य वापर सुरू केल्याने तसे बांधकाम करणाऱ्यांना महापालिका नोटीस देऊन पाडकाम करत आहे. डिसेंबरपासून ही मोहिम सुरू केली आहे. हाॅटेलसह अपार्टमेंटमधील पाडकाम महापालिकेने केले. 


पार्किंगच्या जागेवर महापालिका कारवाई करत असताना काही जण बांधकाम काढत नाहीत. त्यांना नोटीस दिल्यावर दंडासह रक्कम वसूल केली जाईल. याशिवाय गरज पडल्यास वापर परवाना रद्द केला जाईल. वापर परवाना नसेल तर बांधकाम परवान्याची मुदत संपल्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि बांधकाम परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त डाॅ. ढाकणे म्हणाले. 


शहरातील ५८ पेठांत सर्व्हे सुरू अाहे. रविवारी केलेल्या सर्व्हेत डाॅ. शिरीष वळसंगकर यांनी मोदी येथे विनापरवाना कॅन्टीन, टाॅयलेट, वाॅशरूम, जिन्याच्या बाजूस मेडिकल शाॅप काढले आहे. तसेच मुरारजी पेठेतील माधुरी शिवराम पापळ यांनी बेसमेंटमध्ये रेस्टाॅरंट, पार्किंगमध्ये काऊंटर, रूम बांधली आहे. रविवार पेठेतील अजय अन्नलदास, अनिल रापेली यांनी तळमजल्याचा वाणिज्य वापर सुरू केला. बसवराज अक्कलकोटे संतोष अक्कलकोटे यांनीही बेसमेंट नसतानाही बांधकाम केले. विजयकुमार राचर्ला यांनी पाच्छा पेठेतील जागेवर विनापरवाना बांधकाम करून वापर सुरू केला. 

 

रेल्वेलाइन परिसरात मे. कोणार्क बिल्डर यांनी गोदाम ठिकाणी वाणिज्य वापर सुरू केला. शोभाताई गायकवाड यांनी पार्किंगच्या ठिकाणी गाळा बांधला आहे. सिद्धेश्वर पेठेतील सलिम शेख यांनी पार्किंग जागेत हाॅटेल व्यवसाय सुरू केला. मीठ गल्ली येथे अप्पासाहेब वांगी, नंदकुमार बऱ्हाणपुरे, आकुल संजय नंदकुमार, श्री शिंगवी ज्वेलर्स यांनी पार्किंगमध्ये शटर लावून पार्किंग बंद केल्याने नोटीस बजावली. 

बातम्या आणखी आहेत...