आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद, लातूरसह पाच जिल्ह्यांना सोलापुरातून मिळणार पासपोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर शहरातील पासपोर्ट कार्यालयास लातूर, उस्मानाबादसह प. महाराष्ट्र मराठवाड्यातील १२ जिल्हे जोडण्यात आले आहेत. यामुळे आता १२ जिल्ह्यांतील नागरिकांना सोलापूर कार्यालयातून पासपोर्ट काढता येणार आहे. याशिवाय पंढरपूर लातूर येथे पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा सुरू करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. यामुळे प. महाराष्ट्र मराठवाड्यातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी पुणे नागपूर वारी करावी लागणार नाही. 


जुलै महिन्यात सोलापूरला पासपोर्ट कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. सुरुवातीला सोलापूरसह सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना या कार्यालयातून पासपोर्ट काढता येत होते. मात्र परराष्ट्र मंत्रालयांकडूनच सोलापूर पासपोर्ट कार्यालयातून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर तर मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड जालना या जिल्ह्यातील नागरिकांनी अर्जही दाखल केल्याचे पासपोर्ट कार्यालयातील जतीन पोटे यांनी स्पष्ट केले. 

 

१२ जिल्ह्यांना सुविधा... 
सोलापूर पासपोर्ट कार्यालयातून १२ जिल्ह्यांना सेवा दिली जाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. यामध्ये मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड, जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. 
- जे.डी. वैशंपायन, पासपोर्ट अधिकारी, पुणे. 

बातम्या आणखी आहेत...