आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासाच्या नावाने विरोधकांचे खडूस राजकारण : सहकारमंत्री सुभाष देशमुख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण सोलापूर- काँग्रेसची नेतेमंडळी तालुक्याच्या विकासाठी एकत्र आल्याचे सांगतात. पण त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असे खडूस राजकारण आहे, अशी टीका करत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अशा लोकांना थारा न देण्याचे आवाहन केले. अकोले (मंद्रूप) येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेतील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन देशमुख यांच्या हस्ते या वेळी ते बोलत होते.

 
सहकारमंत्री देशमुख म्हणाले, बाजार समिती निवडणुकीच्या तोंडासमोर या गावात विकासकामांचे उद््घाटन झाले. पण विकासाचे राजकारण विरोधकांनी कधीही केलेले नाही. केवळ जातीचे राजकारण केले. तालुक्याची वाट लावली. लोकशाही आहे, त्यामुळे कोणाच्या दबावाखाली राहू नका. गुंजेगावचे सरपंच संतोष पवार व अकोलेचे रमेश आसबे यांना आपल्यासोबत येण्याचे शहाजी पवार यांनी आवाहन केले. तसेच कोणाच्याही दबावाखाली राहू नका, असे सांगत बाजार समितीसाठी साथ देण्याचे आवाहन केले. 


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड म्हणाले, पूर्वी गावासाठी लोक श्रमदान करत. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छ भारत या विकासाच्या योजना आहेत. पण सरकार चार पावले टाकत असेल तर आपण एक तरी पाऊल टाकावे. कर्तबगार माणसे हीच देशाची खरी संपत्ती आहे. पुस्तक वाचनामुळे माणूस बदलतो. विचारावरून माणसाचे व्यक्तिमत्त्व समजते. माणसाची मनस्थिती बदलली तर परिस्थिती नक्की बदलते. या वेळी पंचायत समिती सदस्य महादेव कमळे, सोनाली कडते, हणमंत कुलकर्णी, संतोष पवार, मळसिद्ध मुगळे यांनी मार्गदर्शन केले. 


कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य रामप्पा चिवडशेट्टी, सरपंच प्रियंका आसबे, संतोष पवार, मंद्रूपचे सरपंच विश्वनाथ हिरेमठ, यतीन शहा, उपसरपंच अल्लाउद्दीन शेख, उपसरपंच हणमंत पवार, गटविकास अधिकारी प्रशांतासिंह मरोड, गुरण्णा तेली, सचिन पाटील, सुभाष पाटील, बाळासाहेब माने उपस्थित होते. 


चार दिवसांत भ्रष्टाचार उघड होईल 
अध्यक्षस्थानावरून भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार म्हणाले, राजशेखर शिवदारे यांच्या तक्रारीनंतर बाजार समितीच्या कारभाराची चौकशी झाली. त्यात मागील संचालकांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाले आहे. चार दिवसांत हा भ्रष्टाचार उघड होईल. या मंडळींनी शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार केला नाही. विकासकामापेक्षा काटा काढण्यात विरोधकांना रस आहे. बाजार समितीसाठी शेतकऱ्यांपुढे जावे लागेल. कारण शेतकऱ्यांना आम्ही मताचा अधिकार दिला. 

बातम्या आणखी आहेत...