आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: 'इनामदार की बेटी हो क्या? उनसे कहो की बच के रहना'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- 'मुंबईत असताना दाऊद इब्राहिमच्या अड्ड्यावर छापा मारून साडेतीन कोटी रुपयांचे तस्करीतील सोने जप्त केले. ही पहिली कारवाई होती. माझी मुलगी काॅलेजला सिटीबस ये-जा करायची. कारवाईनंतर काही दिवसांनी तिचा पाठलाग करून गुंडांनी बसमध्ये तिला अडविले. 'अाप, इनामदार की बेटी हो ना? इनामदार को कहे की बच के रहेना.' मुलगी प्रचंड घाबरली होती. तिने हा प्रकार सांगितल्यावर गुंडांचा शोध घेऊन त्यांना 'चूपचाप रहो... नही तो मेहंगा पडेगा,' असा इशारा दिला.' ही अाठवण निवृत्त पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांनी सोमवारी सांगितली. 


श्री. इनामदार हे खासगी कामासाठी सोलापुरात अाले होते. त्यांनी 'दिव्य मराठी' कार्यालयात संपादकीय टीमसोबत अनौपचारिक संवाद साधला. ते म्हणाले, 'हे धाडस येण्यासाठी अापली नीतीमत्ता चांगली पाहिजे. कामाशी प्रामाणिकपणा हवा. पोलिसात काम करताना लोकांत मिसळा. बातमीदारांचे नेटवर्क उभारावे, पोलिस शिपाई हाच खरा बातमीदार अाहे. तळागाळातील संपर्क वाढविल्यास अधिकाऱ्यांची कारकीर्द गाजते. मुख्य काम बातमीदार व सामान्य नागरिकांवरच असते. त्यांच्याशी संवाद वाढवा. विश्वासाला तडा जाऊ देऊ नका.' 


निवासी संपादक संजीव पिंपरकर यांच्या उपस्थितीत वृत्तसंपादक श्रीकांत कांबळे यांनी श्री. इनामदार यांचे स्वागत केले. डाॅ. सतीश वळसंगकर यांचे स्वागत मुख्य बातमीदार मनोज व्हटकर यांनी केले. वरिष्ठ उपसंपादक यशवंत पोपळे यांनी परिचय करून दिला. 


इनामदार बोलले .... 
रतन टाटा यांचे काम अमूल्य अाहे. २६-११ हल्यानंतर ताजचे ८०० कोटींचे नुकसान झाले. दोन वर्षात नव्याने पुन्हा हाॅटेल उभारले. पण, काही कर्मचारी जखमी होते, काही जण मरण पावले. ताजसमोर विविध खाद्यविक्रेत्यांचाही त्यात समावेश होता. त्यांंना ताज कामगार समजून घरी जाऊन प्रत्येकाला मदत दिली. ही माणुसकी फक्त त्यांच्याकडेच अाहे. 


दिल्लीच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या गोष्टी अंतर्गत बाबीत मोडतात. त्या चार िभंतीतीच मिटल्या पाहिजेत. माझ्या मते हे चुकीचे झाले अाहे. 


पत्रकारांची ताकद मोठी अाहे 
पत्रकारांची ताकद मोठी अाहे. अमेरिकेतील वाॅटर गेट प्रकरण मीडियानेच शोधले. यामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला. सामान्य माणसाला पत्रकारच न्याय देऊ शकतो. समोरच्या व्यक्तीला जोपर्यंत प्रश्न विचारत नाही तोपर्यंत बदल होणार नाही. अमेरिकेतच नोबेल पारितोषिक का जातात तर तिथे चिकित्सक वृत्ती अाहे. प्रश्नावर उत्तर शोधले जाते. सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतो. 


अंबानी ग्रुपवर कारवाई करायला मागे पुढे पाहिले नाही. दबाव अाला. मी नमलो नाही. माझी बदली झाली. निवृत्त झालो तरीही अाजही ती केस चालूच अाहे. मी पंढरपुरात उपअधीक्षक असताना डोंबे-पाटील प्रकरण गाजले. त्यावेळी सगळ्यांच्या मुसक्या अावळल्या.