आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च; मिरवणूक मार्गावर अाज दुपारनंतर वाहतुकीत बदल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोमवारी शहरातून विविध मार्गावरून मिरवणूक काढण्यात येणार अाहे. मध्यवर्ती मंडळाच्या अंतर्गत २५ मंडळे यात सहभागी होणार अाहेत. 


शहरात अन्य ठिकाणी २३ मंडळे स्वतंत्र्यपणे मिरवणूक काढणार अाहेत. रविवारी मध्यवर्ती मिरवणूक मार्गावर फौजदार चावडी पोलिसांनी रूट मार्च काढला. सोमवारी सकाळी पोलिस मुख्यालय मैदानावर पोलिसांना बंदोबस्ताबाबत सूचना देण्यात येणार अाहेत. साधारण ३०० मंडळांनी पोलिसांकडे नोंदणी केली. सुमारे पन्नास मंडळ मिरवणूक काढणार अाहेत. दोन हजार पोलिसांचा ताफा सज्ज राहणार असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत केडगे यांनी दिली. शिवाजी चौकाकडे येणारी वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात अाली अाहे. वाहतूक शाखेचा बंदोबस्त वेगळा अाहे. 

बातम्या आणखी आहेत...