आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस असल्याचे सांगून 60 हजार रुपयांचे दागिने लुटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अाम्ही गुन्हे शाखेचे पोलिस अाहोत. दागिने घालून कुठे जात अाहात. काढून ठेवा असे सांगून दोघा तरुणांनी ६० हजार किमतीचे दागिने काढून घेतले व पळून गेले. जंबकुमार मोहनलाल फडे (वय ७२, रा. नवी पेठ, पंढरपूर) यांनी विजापूर नाका पोलिसात तक्रार दिली अाहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेनऊला घडली. 


फडे हे डी-मार्ट ते अंबर हाॅटेलच्या दिशेने जात होते. काही कामासाठी ते सोलापुरात अाले होते. या भागातून जाताना त्यावेळी दोघे तरुण त्यांच्याजवळ अाले. एक तरुण दुचाकीवर पुढे जाऊन थांबला. एकजण त्यांच्यासोबत बोलत थांबला. वरील थाप मारून दागिने काढून घेऊन बांधून देण्याचा बहाणा करून दोघेजण दुचाकीवरून पळून गेले. काही वेळाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत धाव घेतली. फौजदार चौगुले तपास करीत अाहेत. डी-मार्ट ते अंबर हाॅटेल या मार्गावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे अाहेत. ही घटना कैद झाली अाहे का? याची तपासणी करावी. झाली असल्यास त्या अाधारे पोलिस तपास होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...