आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक व्‍यक्तिमत्‍त्‍व विकास स्‍पर्धेत संतोष पाटील यांचे यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बार्शी तालूक्‍यातील जामगाव येथे बीटस्‍तरीय शिक्षक व्‍यक्तिमत्‍त्‍व विकास स्‍पर्धा पार पडली. या स्‍पर्धेत पानगाव येथील जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संतोष पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. स्‍पर्धे अंतर्गत पार पडलेल्‍या कथाकथन स्‍पर्धेत त्‍यांनी हे यश संपादन केले, तर काव्‍यवाचन स्‍पर्धेत शिक्षिका महादेवी स्‍वामी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे. 


समुहगीत स्‍पर्धेत माधुरी भोरे, संतोष पाटील, महादेवी स्‍वामी, सुनिता उबाळे, प्रतापसिंह मोहिते या शिक्षक संघाने द्वितीय क्रमां‍क मिळवला आहे. केंद्रप्रमुख प्रकाश नलावडे, मुख्‍याध्‍यापक सुमन वाळके, राधीका बेदपाठक, संगीता काशिद व शाळा व्‍यवस्‍थापन समितीचे अध्‍यक्ष व प्रमुखांनी  यशस्‍वी शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...