आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात तोळे दागिने रिक्षात विसरले, चालकाने प्रामाणिकपणे परत केले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- तुळजापूर तालुक्यातील सुरतगावात राहणारे अनुराधा गुंड या लेकीला भेटण्यासाठी सोलापुरात अाल्या होत्या. बसस्थानकात अाल्यानंतर शिवाजी चौकातून त्या रिक्षातून भय्या चौकात अाल्या. तिथेच रिक्षात पिशवी विसरली. त्यात पाच तोळे पाटल्या, दीड तोळे लक्ष्मी हार, पाच ग्रॅमची अंगठी असे सात तोळे दागिने, दहा हजार रुपये मोबाइल होता. रिक्षा पुढे गेल्यानंतर ही बाब लक्षात अाली. पोलिस नातेवाईकांच्या मदतीने विसरलेल्या मोबाइलवर फोन केल्यानंतर चालकानेही प्रामाणिकपणे प्रतिसाद देत दागिने परत केले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमाराला घडला. 


श्रीमती गुंड यांची मुलगी दमाणीनगरात राहते. त्यांना भेटण्यासाठी अाल्या होत्या. दागिने पिशवी विसरताच त्यांनी नवीवेस पोलिस चौकीत जाऊन माहिती दिली. पोलिसांनी जावई विठ्ठल शिंदे यांना फोनवरून माहिती दिली. ते लागलीच चौकीत अाले. हवालदार श्रीरंग कुलकर्णी, अविनाश शिंदे, विनोद बनसोडे सहायक निरीक्षक गोविंद पांढरे यांनी शिवाजी चौक, भय्या चौक, बसस्थानक परिसरात चौकशी सुरू केली. काही वेळाने गुंड यांच्या लक्षात अाले की मोबाइलही पिशवीतच विसरला अाहे. त्यावर मोबाइल लावला असता रिक्षाचालकाने उचलला माहिती दिली. तोही योगायोगाने नवीवेस पोलिस चौकीकडे येत होता. चौकीत अाल्यानंतर दागिने पैसे पाहून श्रीमती गुंड यांच्या अानंदाला पारावार उरला नव्हता. त्या अानंदाने रडतच चालकाचे अाभार मानले. 


गोरखनाथ जानदेव जगदाळे ( वय ४०, रा. हौसेवस्ती अामराई) हे रिक्षाचालक अाहेत. एमएच १३ जी ७२७८ ही रिक्षा शिवाजी चौक ते स्टेशन मार्गावर चालवितात. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल गुंड यांनी दोन हजार रुपये देऊन गौरव केला. सहायक निरीक्षक पांढरे यांनीही त्यांचे अाभार मानले. 

बातम्या आणखी आहेत...