आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर- पंढरपूरचे सुपुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांना मरणोत्तर जाहीर झालेला शौर्यचक्रवीर सन्मान सोमवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनात कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शहित कुणाल यांच्या पत्नी श्रीमती उमादेवी गोसावी आणि मातोश्री वृंदा गोसावी यांनी हा सन्मान स्विकारला.
मेजर कुणाल गोसावी हे 29 नोव्हेंबर 2016 पोजी काश्मीरमधील नगरोटा येथे अतिरेक्यांशी लढतांना शहीद झाले होते. दिल्ली येथे सोमवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा सन्मान शहिदांच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला. यावेळी निवेदिकेने शहीद कुणाल गोसावी यांनी नागरोटा येथे गाजवलेल्या पराक्रमाचे वर्णन केले. हे वर्णन ऐकताना संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. त्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटात राष्ट्रपतींच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.