आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळ्यांचे भाडे बाजार मूल्याप्रमाणे घेण्याचा राज्य सरकारचा आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिकेच्या मेजर व मिनी शाॅपिंग सेंटर भाडेवाढ रेडीरेकनरनुसार करावी, असा ठराव महापालिका सभागृहात १६ सप्टेंबर रोजी झाला हाेता. हा निर्णय महापालिकेच्या हिताचा नसल्याने महापालिका आयुक्तांनी ठराव रद्दबातल करण्यासाठी शासनाकडे पाठवला होता. त्यानुसार नगरविकास विभागाने ठराव रद्द करून बाजार मूल्यानुसार भाडे अाकारणी करावी, असा निर्णय कळवला आहे. महापालिकेने पुढील कारवाई करावी, असे शासनाने आदेशात म्हटले आहे. पण त्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. 


महापालिकेच्या मेजर व मिनी शाॅपिंग सेंटर मिळून १३८६ गाळे आहेत. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी लिलाव प्रक्रिया सुरू केली होती. त्याविरोधात शासनाकडे तक्रार आले होते. बाजार भावानुसार आकारणी करा असे शासनाने त्यावेळी १० आॅगस्ट २०१६ रोजी कळवले होते. त्यानंतर महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी सभागृहाकडे प्रस्ताव पाठवला. १६ सप्टेंबर रोजी सभागृहात ठराव झाला. रेडीरेकनर दरानुसार आकारणी करून ज्या गाळेधारकांनी मुदतवाढीसाठी अर्ज केला आहे त्यांना द्यावे, असा ठराव झाला. तो महापालिकेच्या आर्थिक हितास बाधा आणणारा असल्याने रद्दबातल करण्यासाठी आयुक्तांनी ५ आॅक्टोबर रोजी शासनाकडे पाठवले. त्यावर बुधवारी शासनाने निर्णय घेतला असून, त्याबाबत आदेश काढला आहे. 


काय आहे निर्णय? 
मनपाच्या मालकीची स्थावर मालमत्ता भाड्याने देताना अधिमूल्य भाडे चालू बाजारभावापेक्षा कमी असता कामा नये. याबाबत महापालिका प्रशासनाने योग्य प्रस्ताव १४ जून २०१७ रोजी महापालिका सभागृहात सादर केला होता. तो मंजूर न करता १६ सप्टेंबर २०१७ रोजी लोकहिताच्या विरुद्ध निर्णय घेत असल्याने सभागृहाचा प्रस्ताव निलंबित करण्यात येत आहे. बाजारभावाने भाड्याची आकारणी करण्यासाठी योग्य ती कारवाई महापालिकेने करावी. याबाबत हरकत शासन आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसात म्हणजे २३ एप्रिलच्या आत घ्यावी, असे नगर विकास खात्याचे उपसचिव सतीश मोघे यांनी आदेश काढला. 


पुढे काय? 
२३ एप्रिल नंतर महापालिका आयुक्त चालू बाजार भावाने भाडे आकारणी करणार. गाळ्याचा लिलाव करण्याचा अधिकार आयुक्तांना असल्याने त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. लिलाव प्रक्रियेस गाळेधारक व्यापाऱ्यांचा विरोध आहे. 

बातम्या आणखी आहेत...