आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन लाख भाविकांच्या उपस्थितीत रंगला सिद्धरामांचा विवाह सोहळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जवळपास तीन लाख भाविकांच्या उपस्थितीत सोलापुरातील शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांचा विवाह सोहळा शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पार पडला. या यात्रेचे विशेष म्हणजे अनेक राजकीय मंडळींनी यात हजेरी लावली आणि रांगोळीच्या पायघड्यांनी सर्वांची मने जिंकली. 


मागील ८०० ते ९०० वर्षांपासून हा प्रतिकात्मक विवाह सोहळा होत आहे. यात मानाच्या सात नंदीध्वजांना श्री सिद्धेश्वर देवस्थान परिसरातील सम्मती कट्ट्याजवळ नगर प्रदक्षिण करीत आणण्यात येते. येथे हा विवाह सोहळा होत असतो. या यात्रेचे अजून वैशिष्ट्य असे की विविध समाजांना मानकऱ्यांचा मान असतो. यात लिंगायत, माळी, मातंग, सोनार आदींचा समावेश आहे. यंदाच्या यात्रेत संस्कार भारती या कलोपासक संस्थेने सलग २० वर्षे आपली रांगोळीच्या पायघड्या घालून सेवा बजावली. सकाळी साडेसहा वाजता मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू यांच्या वाड्याजवळ रस्त्यावर रांगोळी उपक्रमांचे उदघाटन झाले. दत्त चौकामध्ये रांगोळीचे तब्बल १४ गालीचे रेखाटले. सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरामध्ये १९ शुभचिन्हांचा वापर करण्यात आला. यावेळी मानकरी राजशेखर हिरेहब्बू, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, ज्येष्ठ नेत्या उज्वला शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अक्षता पडल्याने उपस्थित भाविकांमध्ये नाराजी होती. या यात महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक व देशभरातून भाविक सहभागी होत असतात.

बातम्या आणखी आहेत...