आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शिवशाही'मधून आता झोपून जाता येईल मुंबईला; आॅनलाइन काढता येणार तिकीट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर-पुणे मार्गावर शिवशाहीला चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने गुरुवारपासून अक्कलकोट ते मुंबई मार्गे सोलापूर स्लीपर गाडी सुरू करण्यात आली आहे. शिवशाहीमध्ये स्लीपरची सेवा देणारी ही सोलापूर विभागातील पहिली गाडी ठरली आहे. यामुळे मुंबईला शिवशाहीने जाणाऱ्यांचा प्रवास आरामदायक होणार आहे. अक्कलकोट ते मुंबई सेंट्रल तिकिटाचे दर १०५० तर सोलापूर ते मंुबई ९५५ रुपये असणार आहे. 


>ही गाडी दररोज अक्कलकोट बस स्थानकावरून रात्री ९ वाजता सुटेल. सोलापूरला १० वाजता पोहचेल. 
> सोलापूर बसस्थानकावरून १० वाजून १५ मिनिटांनी निघेल. मुंबईला दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पोहोचेल. 
> मुंबई सेंट्रल स्थानकावरून सायंकाळी साडेसहा वाजता सुटेल. सोलापूरला रात्री ३ वाजून १० मिनिटांनी तर अक्कलकोटला पहाटे ४ वाजून ३० मि. पोहोचेल. 


काय आहेत सुविधा 
ही गाडी संपूर्ण वातानुकूलित आहे. तसेच प्रवाशांच्या मनोरंजनासाठी मोफत वायफायची सेवा देण्यात आली आहे. प्रवाशास एक बेडशीट, पिलो, ब्लँकेट, हँड टॉवेल देण्यात येईल. ३० आसन क्षमता आहे. 


सध्या एक स्लीपर सेवा देणारी शिवशाही गाडी सुरू करण्यात आली. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला तर गाडीच्या संख्येत वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जाईल. तसा प्रस्तावही लवकरच मध्यवर्ती कार्यालयाला पाठवला जाणार आहे. 
- रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, सोलापूर 

बातम्या आणखी आहेत...