आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरस्थित प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडने ताब्यात घेतली परदेशातील तिसरी कंपनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यतीन शहा, प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक - Divya Marathi
यतीन शहा, प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक

सोलापूर- सोलापूरस्थित प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडने परदेशातील तिसरी कंपनी ताब्यात घेतली आहे. नेदरलँड येथील इमॉस मोबील सिस्टिम्स बी. व्ही. ही कंपनी प्रिसिजन समूहाचा भाग झाली आहे. इलेक्ट्रिक ड्राइव्हलाइन बनवणाऱ्या या डच कंपनीचे संपादन प्रिसिजनने आपल्या 'पीसीएल इंटरनॅशनल होल्डिंग्ज बी. व्ही.' या पूर्णपणे स्वतःच्या डच सबसिडिअरी कंपनीच्या माध्यमातून केले आहे. प्रिसिजनने आठ महिन्यांमध्ये केलेले हे तिसरे संपादन आहे. नेदरलँड्स येथील इमॉस ही कंपनी ट्रक आणि बससाठी लागणाऱ्या सर्वंकष इलेक्ट्रिक ड्राइव्हलाइन्स बनवण्यात नावाजलेली आहे. 


प्रिसिजनने या डच इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीच्या ५१ टक्के समभागांची खरेदी केली. 'इमॉस' ही इलेक्ट्रिक पॉवरट्रेन्सच्या क्षेत्रातील वनस्टॉप सोल्यूशन असणारी कंपनी आहे. या संपादनामुळे युरोप, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथील इलेक्ट्रिकल मोबिलिटी बाजारपेठेत शिरकाव करण्याची संधी प्रिसिजनला मिळाली. 


प्रिसिजनला वेगळी बाजारपेठ मिळेल 
गेल्या दशकापासून इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत लक्षणीय वाढ होत आहे. विशेषतः व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहने तसेच वैशिष्ट्यपूर्ण सेवा देणाऱ्या वाहनांच्या क्षेत्रामध्ये ही वाढ जास्त आहे. प्रिसिजनच्या जागतिक पातळीवरील ग्राहकांना पुरवठा करण्याच्या अनुभवाचा उपयोग 'इमॉस'ला होईल. शिवाय प्रिसिजनला वेगळी बाजारपेठही मिळेल. 
- यतीन शहा, प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक 

बातम्या आणखी आहेत...