आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SOLAPUR: 350 रेल्वेतून 15 लाख प्रवासी पॅन्ट्रीतील घेतात खाद्यपदार्थ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रेल्वेत प्रवाशांना मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र त्यावर ठोस कारवाई होत नाही. नुकतीच पुरी -हावडा शताब्दी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रकरण समोर आले. रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटरवर रोज प्रवाशांकडून ६ हजार तक्रारी येतात. पैकी सर्वात जास्त गाडीच्या उशिराबाबत व खराब अन्नपदार्थांबाबत असतात. रेल्वेतील पॅन्ट्री कार आयआरसीटीसीच्या नियंत्रणाखाली असते. तेथील अन्नपदार्थांचा दर्जा तपासण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असते. मात्र  संपूर्ण देशात अन्न पदार्थांचा दर्जा तपासणारे केवळ ५६ अधिकारी आहेत. इतकी कमी संख्या असताना अनेकदा अन्नपदार्थांचा दर्जाच तपासला जात नाही. रेल्वेचा हा गलथानपणा अनेकदा प्रवाशांच्या जिवावर उठला आहे.   


देशभरातील सुमारे ३५० रेल्वे गाड्यांना पॅन्ट्री कार जोडण्यात आले. यात राजधानी, दुरांतो, शताब्दी व प्रीमियम सारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे.  रोज यातून सुमारे १५ लाख प्रवासी अन्नपदार्थ घेत असतात. प्रत्येक विभागाला एक अन्न सुरक्षा अधिकारी देण्यात आला. प्रवाशांनी व्हेजची मागणी केली असता नॉनव्हेज पदार्थ देणे. भाजी किंवा भातात झुरळ अथवा मेलेली पाल निघणे आदी पदार्थांचा अनुभव प्रवाशांना आला. ज्या प्रवाशांनी पॅन्ट्रीच्या खाद्यपदार्थाची तक्रार केली त्यांच्याच तक्रारींची नोंद केली जाते. उर्वरित तक्रारी पॅन्ट्रीचे मॅनेजर अथवा सुपरवायझर हे स्थानिक स्तरावरच दाबून ठेवतो. रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार,  २०१४ - १५ रेल्वेतील खाद्यपदार्थ विषयी ७, ०५५ तक्रारी प्राप्त झाल्या. तर २०१५ -१६ ला ८७०८ आणि २०१७ -१८ मध्ये १० हजार ४३७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. खाद्यपदार्थांचा दर्जा चांगला राहण्यासाठी आणखी अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल, असे महासंचालक वेदप्रकाश यांनी सांगितले.

 

रेल्वेच्या बेस किचनवर नियंत्रण महत्त्वाचे   

अायआरसीटीसीचे संपूर्ण भारतात १६ रेलवे स्थानकावर  बेस किचन आहे. येथे मोठ्या प्रमाणात अन्न तयार करून ते पॅन्ट्री नसलेल्या रेल्वेत पुरवठा करतात.यात बिलासपूर, सेलदाह, काटपाडी, अलाहाबाद, नोएडा, झांसी, जम्मू तावी, नवी दिल्ली, सीएसमटी , मुंबई सेन्ट्रल, पुणे, भुसावळ, कोटा, सिकंदराबाद, रेणीगुंटा व गुंटकल आदी स्थानकांचा समावेश आहे.  या ठिकाणी आयआरसीटीसीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र येथून देखील खराब अन्नपदार्थांचा पुरवठा होऊ शकतो.   

 

 

बातम्या आणखी आहेत...