आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर -हैदराबाद शिवशाही सोमवारपासून धावणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर -पुणे मार्गावर शिवशाहीला सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर आता एसटी प्रशासन सोलापूर -हैदराबादसाठी शिवशाही एसटी सुरू करीत आहे. मुंबईहून दोन शिवशाही गाड्या सोलापुरात दाखल झाल्या असून येत्या सोमवारपासून सोलापूर ते हैदराबाद शिवशाही एसटी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अश्वजित जानराव यांनी दिली. 


सोलापूर ते हैदराबाद ५१४ रुपये तिकीट दर असणार आहे. दाळिंब, हुमनाबाद, उमरगा आदी स्थानकावर गाडीला थांबा असणार आहे. सोलापूर विभागाला आतापर्यंत जवळपास २१ शिवशाही गाड्या मिळालेल्या आहेत. सोलापूर -हैदराबादसह अकलूज -हैदराबाद एसटी सेवा सुरू होत आहे. सोलापूर विभागाने सोलापूर -नाशिकसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवशाही गाड्यांची उपलब्धता झाल्यानंतर आणखी काही गाड्या सोलापूरला मिळणार आहेत. तेव्हा सोलापूर -नाशिक ही सेवा सुरू होईल. 


दिवसातून पाच फेऱ्या होणार 
सोलापूर - हैदराबाद : सायं ६ वाजून १५ मि., ७.३० मि., रात्री ८ .३० , ९.३० आणि १०.३० मि. 
हैदराबाद ते सोलापूर - सकाळी ६ वाजता, १० वा, १०.३० मि., ११.३० मि., व दुपारी १२.३०