आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर-मुंबई एक्स्प्रेस: मुंबईसाठी वेटिंगच राहील, जनरलमध्ये प्रवेश अशक्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- लातूर-मुंबई एक्स्प्रेस बिदरला गेल्यानंतर लातूरकरांच्या हक्काच्या गाडीवर गदा आली. आरक्षित तिकीट मिळणे असो की जनरल डब्यात प्रवेश मिळविणे सारेच कठीण झाले. आहे. लातूरकर मंडळी एसीच्या डब्यात खाली झोपूनच प्रवास करतात. हीच परिस्थिती आता सोलापूरकरांवर ओढावणार आहे. कारण सोलापूर -मुंबई एक्स्प्रेसचे गदगपर्यंत विस्तारीकरण झाल्यानंतर आता ही गाडी गदगपासूनच भरून येईल. सोलापूरकरांचा प्रवास वेटिंग वर नाही तर सीटखाली झोपूनच करावा लागणार आहे. 


सोलापूर -मुंबई एक्स्प्रेसला १२ डबे जोडण्यात आलेले आहे. यात २ एसएलआर, १ प्रथम व द्वितीय श्रेणी एकत्रित वातानुकूलित डबा, २ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ४ शयनयान तर ३ सर्वसाधारण डब्यांचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाने गाडीचे विस्तारीकरण करताना डब्यांच्या संख्येत कोणतीच वाढ केलेली नाही. मात्र त्यातून प्रवास करणा ऱ्यांची संख्या वाढविली आहे. 


कोटा आरक्षित तिकिटासाठी जनरलचं काय 
रेल्वे प्रशासनाने ९० टक्के कोटा सोलापूर ते मुंबईसाठी राखीव ठेवला, ही बाब चांगली आहे. मात्र अनारक्षित तिकीटधारकांचं काय होणार. विजापूर -मुुंबई फास्ट पॅसेंजरला अनारक्षित तिकीटधारकांची मोठी गर्दी असते. ज्यांना या गाडीने प्रवास करायचा नसेल किंवा ज्यांना जागा मिळणार नाही असे लोक गदग -मुंबई एक्स्प्रेसने मुंबई गाठू शकतील. त्यामुळे सोलापूरकरांना जनरल डब्यात पाय ठेवायलाही जागा मिळणार नाही. 


हक्काची गाडी जाऊ देणार नाही 
सोलापूर - मुंबई एक्स्प्रेस ही सोलापूरकरांसाठीच अाहे. ती गदगला नेण्यात येत असेल तर चुकीचे अाहे. हीच गाडी मी सोलापुरात अाल्यानंतर सोलापुर -पुणे- सोलापूर शटल सेवा सुरू करा म्हणून रेल्वेचे जीएम व रेल्वे मंत्र्यांशी यापूर्वीच बोललो अाहे. पुन्हा जर ही गाडी मुंबई, सोलापूर ते गदग अशी नेणार असेल तर दिल्लीत रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन माहिती देईन. सोलापूरकरांच्या हक्काची गाडी गदगपर्यंत जाऊ देणार नाही.
- शरद बनसोडे, खासदार 


सोलापूरच्या प्रवाशांवर अन्याय व्हायला नको 
जरी गाडी पुढे गदगपर्यंत वाढवली असली तरी पूर्वीची असणारी रिझर्व्हेशन संख्या कायम ठेवावी. जिल्ह्यातील प्रवाशांवर अन्याय होऊ नये.
- नारायण पाटील, आमदार, करमाळा 


अाम्ही तीव्र करणार 
सोलापूर-मुंबई एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी ज्या उद्देशाने सुुरुवात करण्यात आली होती. त्यानुसार ती फक्त सोलापूर-मुंबईच असायला हवी. याचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यांनी हा निर्णय घेताच मी पत्राद्वारे याचा विरोध केला आहे. गदगसाठी स्वतंत्र रेल्वे द्या, त्याला आमची हरकत नाही. मात्र आमच्या सोलापूरकरांसाठी जी गाडी आहे त्याचे विस्तारीकरण करू नये. आम्ही शांत बसणार नाही, तीव्र विरोध करणारच.
- प्रणिती शिंदे, आमदार 


सरकारचा निर्णय योग्यच 
सोलापूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेले शहर आहे. त्यामुळे सोलापूर-मुंबई एक्स्प्रेसचे विस्तारीकरण करून गदगपर्यंत नेले तो निर्णय योग्यच आहे. कारण यामुळे कर्नाटक आणि सोलापूरचे नाते अजून चांगले होईल. विस्तारीकरण करताना सोलापूरसह गदगचाही विचार करण्यात आला हे योग्य आहे.
- शोभा बनशेट्टी, महापौर 

बातम्या आणखी आहेत...