आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर दगडफेक करणाऱ्याची जामिनावर सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा (सोलापूर)- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रिधोरे(ता. माढा) येथे आलेले राज्यमंत्री खोत यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेतील आरोपीची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

 


आरोपी बापु गायकवाड यांना रविवारी दि 25 रोजी दुपारी माढा कोर्टासमोर उभे केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.एन.थोरात यांनी जामीन अर्ज मंजुर करत त्याची सुटका केली आहे. या प्रकरणी गायकवाड याच्या बाजुने अॅड. गजानन काळे यांनी काम पाहिले.  तर गाजर, तुर गाडीवर फेकुन देत काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष महावीर सावळे, जिल्हा संघटक सिध्देश्वर घुगे, प्रसिध्दी प्रमुख सत्यवान गायकवाड या चौघांविरोधात कुर्डूवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...