आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डफरीन चौकातील सुपर पेट्रोल पंप रात्री 12 वाजेपर्यंत सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील पेट्रोल पंप रात्री दहानंतर बंद होतात. यामुळे अनेक वाहनधारकांची गैरसोय होत होती. ही गैरसोय दूर करण्यासाठी डफरीन चौकातील सुपर पेट्रोल पंप रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत अाहे. रात्री १० ते १२ यावेळेत एक पेट्रोल एक डिझेल मशिन सुरू राहतील. रात्री बारानंतर वाहनचालकाला इंधन पाहिजे असल्यास पंपावरील कर्मचारी सुरक्षा रक्षकाला विनंती केल्यानंतर सेवा देतील. 


सोलापुरात २३ पेट्रोल पंप अाहेत. काही महिन्यांपूर्वी रात्री बारापर्यंत सुरू असणारे पंप दहा वाजताच बंद होऊ लागले. परगावहून येणारे नागरिक, नोकरदार यांच्या वाहनातील पेट्रोल अचानक संपल्यानंतर त्यांना त्रास सहन करावा लागत होता. ही गैरसोय दूर करण्यासाठी सुपर पेट्रोल पंप प्रशासनाने रात्री दहा ते बारा यावेळेत पंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला अाहे. त्याची अंमलबजावणी एक डिसेंबरपासून सुरू झाली अाहे. 


रात्री बाराला कर्मचारी सुरक्षा रक्षक पंपावरच असतील. पण, कुणाला इंधन पाहिजे असल्यास त्यांना विनंती केल्यानंतर इंधन भरून देतील, असे पंपचालकाकडून सांगण्यात अाले. पोलिसांनीही संरक्षण देण्याची हमी दिली अाहे. रात्री कुणी गोंधळ घालून पंपावरील कामगाराला मारहाण करणे, िशवीगाळ करणे असे प्रकार केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात अाला अाहे.

 
अशोक चौकातील पंपही रात्रीच्यावेळी सुरू राहणार 
मागील अाठ- नऊ महिन्यांपूर्वी अशोक चौकात शहर पोलिस दलातर्फे पेट्रोल पंप सुरू करण्यात अाले अाहे. तो पंपही सुरुवातीपासूनच रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात अालाय. अाता मध्यवर्ती भागात म्हणजे सुपर पेट्रोल पंप सुरू झाल्यामुळे नागरिकांची सोय झाली अाहे. हा पंप चालू करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सुहास कदम, निशांत साळवे यांनी पंपचालकांकडे पाठपुरावा केला होता. नागरिकांची गैरसोय दूर झाल्यामुळे पंपचालकांचे अाभार मानून सत्कार करण्यात अाला. यावेळी अक्षय जाधव, रितेश चव्हाण, अाकाश दिघे, ऋषिकेश काळे, अजय चव्हाण, श्रीकांत माने, पृथ्वी सावंत यांची उपस्थिती होती. 

बातम्या आणखी आहेत...