आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- २००४ मध्ये मी मुख्यमंत्री असताना काँग्रेस पुन्हा सत्तेत अाली. पण त्यानंतर काँग्रेसच्याच काही नेत्यांनी लाॅबिंग केले त्यामुळे दुसऱ्या वेळी मला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळू शकली नाही. त्यांनी सोनिया गांधींना फसवले गेले. मात्र, हे साेनियांच्या लक्षात अाल्यानंतर त्यांनी मला केंद्रात मंत्रिपद देऊन लोकसभेच्या नेतेपदावर निवडले, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला.
शिंदे यांनी बुधवारी पत्रकारांशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्या वेळी अापल्या जीवनातील वाटचालीतील अनेक िकस्से सांगत राजकारणातील गंभीर विषयावरही अापली मते परखडपणे मांडली. महाराष्ट्रात २००४ मध्ये माझ्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पुन्हा सत्ता मिळवली होती. पण त्या वेळी काही पक्षाच्या नेत्यांनी प्लॅनिंग करून मला मुख्यमंत्रिपदावरून हटवले. त्यानंतर मला राज्यपाल करण्यात अाले. त्यासाठी सोनिया गांधींनाही चुकीचे सांगून फसवण्यात अाले. पण हे सोनिया गांधी यांना जेव्हा समजले तेव्हा राज्यपालपदावरून थेट केंद्रात ऊर्जामंत्री म्हणून शपथ घ्यायला लावली. त्यानंतर गृहमंत्रिपद िदले. एवढेच नाही तर सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदाच्या सम असलेले लोकसभेचे नेतेपद मला िदले, अशी माहितीही िशंदे यांनी िदली. सोनिया गांधी अाणि राहुल गांधी यांच्या कार्याचे कौतुक करताना १८ वर्षे सोनिया गांधी काँग्रेसचे नेतृत्व केले, लोकांनीही त्यांना स्वीकारले ही साधी बाब नाही, असा उल्लेख केला. राहुल गांधी हे हुशार अाहेत. संघाने त्यांची टवाळी करण्याचा प्रयत्न केला, पण गुजरात निवडणुकीनंतर गांधी यांचे नेतृत्व पुन्हा समोर अाले अाहे. गांधी घराण्याचा देशात नेहमीच गौरव झाला अाहे, तोच वारसा राहुल गांधी चालवतील. या वेळी त्यांच्यासमवेत शहराध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी अामदार प्रकाश यलगुलवार, नगरसवेक चेतन नरोटे उपस्थित होेते.
प्रणिती मुख्यमंत्री हाेईल
प्रणिती िशंदे सध्या नवीन अाहे, ती धाडसाने बोलते, स्पष्टवक्तेपणा अाहे. काँग्रेसची सत्ता अाली तर ती राज्यमंत्री होऊ शकेल, नंतर मंत्रिपद मिळू शकेल. काही कालावधी लागेल. ितचे काम पाहिले तर ती मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचेल, असा मला एक पिता अाणि राजकारणी म्हणूनही विश्वास अाहे, असे सुशीलकुमार िशंदे म्हणाले.
एकत्र निवडणुका घ्या, पण शिक्के मारून
ईव्हीएम मशीनवर अनेक राजकीय पक्षांचा आक्षेप आहे. तसेच यातून मोदी सरकारच्या हेतूकडे पाहण्यात येत आहे. त्यामुळे एकत्रित निवडणुका घ्यायच्या असतील तर पूर्वीसारखे शिक्के मारून मतदान करण्याची मुभा िदली पाहिजे. म्हणजे निवडणुकांत कोणती गडबड होणार नाही, शंका उपस्थित होणार नाहीत.
काँग्रेसमध्ये असते तर पवार पीएम झाले असते
शरद पवार जर काँग्रेसमधून बाहेर पडले नसते तर ते तेव्हाच पंतप्रधान झाले असते, दुसरे नाव आमच्याकडे तेव्हा नव्हतेच, असे सांगून जर अाता ते काँग्रेसमध्ये अाले तर त्याशिवाय दुसरा अानंद नाही, असे वक्तव्य एका प्रश्नाच्या उत्तरात केले. अाता केंद्रात विरोधकांचे नेतृत्व कोण करणार यावर दहा जनपथवर बैठका सुरू अाहेत, असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.