आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टँकर पाणीपुरवठा घोटाळा, लिपिक नंदा निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका टँकर घोटाळाप्रकरणी आवश्यक असलेले रजिस्टर गायब झाल्याने महापालिका आयुक्तांना पहिली विकेट घेतली आहे. कुमार नंदा या लिपिकास निलंबित केले आहे. याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत महापालिका आयुक्तांनी दिले. 

 

टँकर घोटाळाचा संशय असल्याने महापौर बनशेट्टी यांनी चौकशीचे आदेश दिले. आठ दिवसांत   चौकशी अहवाल सभागृहाकडे येणार आहे. महापालिका सभागृहात शुक्रवारी या घोटाळा प्रकरणी चर्चा होत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. भवानी पेठ वाॅटर हाऊस येथे टँकर नोंद घेण्याची जबाबदारी पाणीपुरवठा विभागातील लिपीक कुमार नंदा यांच्याकडे होती. त्यांनी तेथील रजिस्टर अन्य कर्मचाऱ्यांकडे न सोपवताच निघून गेल्याने तेथील रजिस्टर गायब झाले आहे. याप्रकरणी नंदा यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानुसार आयुक्त डाॅ. ढाकणे यांनी नंदा यांना निलंबित केले. त्यांच्यावर जबाबदारी असताना पार पाडली नाही, कर्तव्यात कसूर केल्याने निलंबित करण्यात आल्याची माहिती आयुक्त डाॅ. ढाकणे यांनी दिली. याप्रकरणी चौकशीचे आदेश मुख्य लेखापरीक्षकांना दिले आहेत. 


 

बातम्या आणखी आहेत...