आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे कॉन्स्टेबलच्या शर्टवर आता कॅमेरा; सुरक्षा व्यवस्था पारदर्शक होण्यास होणार मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- प्रवाशांनो, आता थोडे सावध राहा. कारण तुम्ही एखाद्या तक्रारीवरून आरपीएफ वा अन्य रेल्वे कर्मचाऱ्यांशी भांडत असाल तर त्याचे चित्रीकरण होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने आता आरपीएफ कॉन्स्टेबलच्या पोशाखावर खांद्याजवळ बॉडी कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच आरपीएफ कॉन्स्टेबलच्या शर्टवर बॉडी कॅमेरा बसवला आहे. पश्चिम रेल्वेतील अहमदाबाद विभागात याची सुरुवात झाली असून अहमदाबाद-दिल्लीदरम्यान धावणाऱ्या स्वर्णजयंती राजधानी एक्स्प्रेसमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली. बॉडी कॅमेऱ्याचा वापर केवळ प्रवाशांच्या भांडणासाठीच नाही तर रेल रोको, रेल्वेवरील दरोडे, लूटमार व इतर घटनांचे चित्रण करण्याबरोबरच आरपीएफ कर्मचारी हा काम करतो की नाही हे तपासण्यासाठीही होणार आहे. 

    
पश्चिम रेल्वेने राजधानी एक्स्प्रेसमध्ये गस्त घालणाऱ्या ८ आरपीएफ काॅन्स्टेबलच्या शर्टवर बॉडी कॅमेरा बसवला आहे. युरोपीय रेल्वेच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला. यामुळे रेल्वेसंदर्भातील गुन्हेदेखील कमी होण्यास मदत मिळणार आहे.  हा प्रयोग यशस्वी झाला तर देशातील अन्य विभागांतही तो लागू होण्याची दाट शक्यता आहे. कारण अनेकदा रेल्वेवर दगडफेक अथवा दरोड्याचे प्रसंग घडतात. या वेळी प्रवासी आरपीएफ हे त्या डब्यात नव्हते किंवा गाडीला संरक्षण असतानाही आरपीएफ गाडीत चढलेच नाहीत, असा अारोप करतात. अशा घटना टाळण्यासाठीच रेल्वे प्रशासनाने बॉडी कॅमेरा बसवला आहे. त्यामुळे एक प्रकारे त्या कॉन्स्टेबलवरही रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर राहणार आहे. शिवाय कॅमेऱ्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न कॉन्स्टेबलकडून झाल्यास त्याचीही नोंद होणार आहे.  

 

पारदर्शकतेसाठी उपयोगी ठरणार

प्रवाशांच्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी, शिवाय आरपीएफ कॉन्स्टेबल काम करतो की नाही हे तपासण्यासाठी त्यांच्या शर्टवर बॉडी कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला. रेल्वेच्या सुरक्षा  व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रायोगिक तत्त्वावर घेतलेला निर्णय अन्य गाड्यांमध्ये व विभागात लागू होऊ शकतो.
- दिनेश कुमार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, अहमदाबाद, पश्चिम रेल्वे

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, असा आहे कॅमेरा...

बातम्या आणखी आहेत...