आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामस्तकाभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात; उद्या भव्य मिरवणूक, श्रवणबेळगोळचा साेहळा शुक्रवारपासून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ‘कर्नाटकातील हसन जिल्ह्यात श्रवणबेळगोळ येथे बाहुबली महामस्तकाभिषेक होत असून, त्यासाठी मागील वर्षापासून तयारी करण्यात येत आहे. सुमारे ५०० जैन मुनी तेथे आहेत. तयारी अंतिम टप्यात असून, १६ फेब्रुवारीपासून मुख्य सोहळ्यास सुरुवात होत आहे. शुक्रवारी विद्यागिरी पर्वताच्या चारही बाजूस पाच किलोमीटर लांबीची मिरवणूक काढण्यात येणार आहे,’ अशी माहिती चारुकीर्ती भट्टारक स्वामी यांनी दिली.    


महामस्तकाभिषेकासाठी १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे येणार आहेत. विद्यागिरी पर्वतावर तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक शिडीचे उद्घाटन करतील. बाहुबली जनरल हाॅस्पिटल उद्घाटन, दुपारी धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवणार आहेत. १८ फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी तेथे येतील. २५ फेब्रुवारी रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती राहील. शुक्रवारी मिरवणूक काढण्यात येणार असून त्यात २०० बँडपथके, २४ तीर्थंकरांच्या पालख्या, ६ शस्त्ररथ, सोने व चांदीपासून तयार केलेले ८ रथ असतील. यात सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.   


विविध राज्यांतील खाद्यसामग्री   

महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी विविध राज्यांतून ३० ते ४० लाख जनसमुदाय असेल. त्यांच्यासाठी विविध राज्यांतून खाद्यसामग्री मागवण्यात आली आहे. ११ कोटी रुपये खर्च करून मंडप उभे करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट, ३५० मुनींची व्यवस्था, २०० ब्रह्मचारी सेवेकऱ्यांची व्यवस्था, दोन हजार व्हीआयपी, डोंगरावर दवाखाना, संगीतकारांसाठी व्यवस्था आदी नियोजन करण्यात आले  आहे.

बातम्या आणखी आहेत...