आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठड्याला धडकून कॅनॉलमध्ये काेसळली जीप, तिघे जागीच ठार; सोलापूर जिल्ह्यात घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाळा- सहलीसाठी गोव्याकडे जात असलेल्या कुटुंबीयांच्या वाहनाला अपघात होऊन तीन मामा-भाचे ठार झाले. करमाळा-टेंभुर्णी महामार्गावर कुंभेज फाट्याजवळ बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने कठड्याला धडकून वाहन कॅनॉलमध्ये पडल्याने हा अपघात झाला. 


फारुख रमजान शेख (६२), तहेरीम जफर अहमद शेख (२२), फरहान एहसान खान (२३) अशी मृतांची नावे असून सर्व जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील इस्लामपुरा गावचे रहिवासी आहेत. रमजान ईद पार पडल्यानंतर इस्लामपुरा येथील या कुटुंबीयांनी सहलीसाठी गोव्याला जाण्याचे ठरवले. मंगळवारी रात्री फारुक शेख हे तहेरीम व फरहान या भाच्यांसह बोलेरो जीपमध्ये, तर फारुख शेख यांचा मुलगा व अन्य सहा जण अन्य वाहनात बसले. दरम्यान, रात्री बाराच्या सुमारास दोन्ही वाहनांत अंतर वाढले. बोलेरो पुढे होती. 


करमाळा- टेंभुर्णी मार्गावर कुंभेज येथून काही अंतरावर अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी दहिगाव उपसा सिंचनासाठी कॅनॉल खोदण्यात आला आहे. त्याच्या आधी चारपदरी रस्ता बंद केला असून, पुढे कॅनॉलसाठी पुलावर कठडा बांधला आहे. पहाटे पाचच्या सुमारास फरहान जीप चालवत होता. या ठिकाणी आल्यानंतर अचानक रस्ता संपल्याचे पाहून त्याने वेगवान जीप उजव्या बाजूने वळवली. मात्र, फरहानचा त्यावरील ताबा सुटला. अशातच जीप उजव्या बाजूच्या कॅनॉलच्या कठड्याला धडकून लिंबाच्या झाडाला धडकली आणि थेट ७० ते ८० फूट खोल कॅनॉलच्या खड्ड्यात जाऊन पडली. या वेळी फारुक शेख जीपच्या छतासह कॅनॉल पुलाच्या कठड्याला अडकून राहिले, तर फरहान व तहेरीम हे कॅनॉलच्या पाण्यात जाऊन पडले. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. 

बातम्या आणखी आहेत...