आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण झालेल्या तरुणाचा भोंदूबाबासह तिघांकडून खून; कराड तालुक्यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- कराड तालुक्यातील गायकवाडी येथून अपहरण झालेल्या तरुणाचा भोंदूबाबासह तिघांनी खून केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला असून यामागे रेडिएशन पाॅवर विद्या कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. किशोर गायकवाड (२८) असे मृत तरुणाचे नाव आहे.  याप्रकरणी सर्जेराव सावंत ऊर्फ महाराज, सागर देसाई आणि राहुल शिंदे (सर्व रा. जि. सांगली) यांना अटक करण्यात आली आहे.  


किशोर १३ जुलै २०१७ रोजी  कारसह बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी उंब्रज पोलिसांत दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दोन पथके तयार केली. एका खबऱ्याने माहिती दिल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. सर्जेराव, त्याचा मेहुणा सागर व साथीदार राहुल यांनी किशोरकडून रेडिएशन पॉवर विद्येसाठी  ११ लाख रुपये घेतले होते. याद्वारे तिघेही लोकांना पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून गंडवत होते. अनेक दिवस झाल्यानंतरही तिघे पैसे परत करत नसल्याचे किशोरने त्यांच्याकडे तगादा लावला होता. त्यामुळे त्यांनी संगनमत करून किशोरला एका निर्जनस्थळी बोलावून घेतले. त्यानंतर त्याचा वायरने गळा  त्याचा खून केला. 


त्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून कोल्हापूरच्या विशालगड जंगलात फेकून दिला. तसेच शंका येऊ नये म्हणून किशोरचा गाडी आणि मोबाइल पुणे, मुंबई आणि इतर परिसरात फिरवल्याचे त्यांनी सांगितले. 


नेत्यांनाही गंडा
तिघांनी बडे अधिकारी, नेत्यांनाही १० कोटी रुपयांना गंडा घातल्याची चर्चा परिसरात आहे. साताऱ्यातील एकांत असलेल्या बंगल्यामध्ये असे प्रकार होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.