आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिकीट पर्यवेक्षकांना आता नव्या रंगाचा गणवेश; कोटचा खिसा, टायवर भारतीय रेल्वेचा लोगो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रेल्वे तिकीट तपासण्यासाठी येणारे तिकीट पर्यवेक्षक आता लवकरच नव्या रंगात व नव्या ढंगात दिसणार आहे. काळा कोट, पांढरी पँट , व लाल रंगाचा टाय हे लवकरच हद्दपार होणार असून या जागी ग्रे रंगाचा कोट, ग्रे रंगाची पँट, कोटाच्या खिशावर भारतीय रेल्वेचा लाेगो व लाल रंगाच्या टायवरदेखील भारतीय रेल्वेचा लोगो असणार आहे. रेल्वे बोर्डाने तिकीट पर्यवेक्षकाच्या या नव्या गणवेशाला मंजुरी दिली असून लवकरच त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. प्रारंभी हा गणवेश केवळ राजधानी, दुरांतो व शताब्दी एक्स्प्रेसमध्ये काम करणाऱ्या तिकीट पर्यवेक्षकांपुरताच मर्यादित राहणार आहे. याचा प्रतिसाद पाहून सर्व तिकीट निरीक्षक व तिकीट पर्यवेक्षकांनादेखील हा गणवेश लागू केला जाईल.


तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांचे गणवेश 
बदलण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्यांनी प्रसिद्ध फॅशन डिझायनर रितु बेरा यांना गणवेशाचे डिझाइन करण्याचे सांगितले.  गणवेशाचा पहिला प्रयोग रेल्वेचे ब्रँड अॅम्बेसेडर समजले जाणाऱ्या तिकीट पर्यवेक्षकांवर करण्यात आला.

 

विमान कर्मचाऱ्यासारखा आहे नवा गणवेश
पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट , ग्रे रंगाचा कोट त्यावर वैमानिकाप्रमाणे तीन पिवळ्या रंगाच्या पट्ट्या, कोटाच्या खिशावर लाल रंगाचा भारतीय रेल्वेचा लाेगो, ग्रे रंगाची पँट तसेच लाल रंगाच्या टायवर भारतीय रेल्वेचा लोगो असणार आहे.

 

लवरकच अंमलबजावणी
रेल्वे बोर्डाने तिकीट पर्यवेक्षकांसाठी नवा गणवेश तयार केला आहे. याची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व झाेनच्या सरव्यवस्थापकांना देण्यात आले आहेत. लवकरच याची अंमलबजावणी सुरू होईल.
- अनिल कुमार सक्सेना, मुख्य जनसंपर्क अधिकारी, रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली

बातम्या आणखी आहेत...