आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- रेल्वे रुळाच्या सुरक्षिततेसाठी गस्त घालणाऱ्या ट्रॅकमनला आता रुळांसाेबतच स्वत:च्या सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी लागत अाहे. रात्रीच्या वेळी या कर्मचाऱ्यांवर अस्वल व इतर वन्य प्राण्यांकडून हल्ल्याच्या घटना वाढत अाहेत. यात काही कर्मचारी गंभीर जखमीही झाले अाहेत. अशा संकटांपासून बचावासाठी मध्य रेल्वे विभागाने अाता ट्रॅकमनला विशेष प्रशिक्षण देण्यात अाले.
हिवाळ्यात रेल्वे रूळ अाकुंचन पावतात, तर उन्हाळ्यात प्रसरण पावतात. त्यामुळे रेल्वे गाड्यांना अपघात हाेण्याचा संभव असताे. हा धाेका टाळण्यासाठी या दाेन्ही ऋतूंत रुळांवर गस्त देण्यास रेल्वे खात्याकडून प्राधान्य दिलाे जाते. महाराष्ट्रातील काही रेल्वेमार्ग हे जंगलातून, डाेंगराळ भागातून गेलेले अाहेत. अशा प्रतिकूल भागातही ट्रॅकमन डाेळ्यात तेल घालून गस्त देत असतात. नागपूर रेल्वे विभागातील ट्रॅकमन रवीकुमार पांडे व बख्तियार अहमद हे अमला ते इटारसीदरम्यान ट्रॅकवरून गस्त घालत होते त्याचवेळी अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवला हाेता. यात हे दाेघेही गंभीर जखमी झाले हाेते. या प्रकाराची गंभीर दखल घेत विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार गुप्ता यांनी तत्काळ ट्रॅकमनच्या संरक्षणासाठी वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. दिल्ली येथील ‘वाइल्ड लाइफ ट्रस्ट’कडून ६१ ट्रॅकमनला १० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात अाले. नागपूर विभागातील एकूण १५० ट्रॅकमनला टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जाईल.
विशिष्ट अावाजाची टाॅर्च करणार बचाव
जंगलात कोणत्या प्रकारचे प्राणी असतात, पायाच्या ठशावरून त्यांना कसे अाेळखायचे. अचानक प्राणी समाेर अाल्यावर काय करायचे याबाबत ट्रॅकमनला प्रशिक्षणात माहिती देण्यात अाली. तसेच प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी विशिष्ट अावाजाची टाॅर्च, इतर उपकरणे व लाल मिरची पावडर देण्यात अाली.
भयमुक्त कर्मचारी
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. ट्रॅकमनला तर काम करणे अवघड झाले होते. त्यांचे संरक्षण व्हावे, हरवलेला आत्मविश्वास पुन्हा यावा याकरिता वन्यप्राणी तज्ज्ञांच्या मदतीने प्रशिक्षण दिले जात अाहे. या प्रशिक्षणामुळे रेल्वे कर्मचारी भयमुक्त वातावरणात काम करत अाहेत.
- ब्रिजेशकुमार गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर मध्य रेल्वे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.