आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येरवडा कारागृहातील दोनशे कैद्यांना प्रगत शेती करण्याचे प्रशिक्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कारागृहातील कैद्यांना अद्ययावत शेतीचे प्रशिक्षण देण्यात येत अाहे. पुणे येथील शासकीय कृषी विद्यालयात दररोज २०० कैद्यांना शेतीविषयक माहिती देण्यात येते. भविष्यात ते जेव्हा बाहेर येतील तेव्हा त्यांना पूरकशेती करता यावी हा उद्देश अाहे. 


पुणे येरवडा कारागृहातील जे कैदी खुले कारागृहात काम करतात. अशा दोनशे कैद्यांसाठी शासनाकडून िवशेष परवानगी घेऊन दररोज त्यांना पुणे कृषी विद्यालयात प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे त्यांना दोनशे रुपये मानधन दररोज मिळते. अाधुनिक शेती कशी करावी याचे ज्ञान दिले जाते. हा चांगला उपक्रम सुरू केल्याची माहिती राज्याचे कारागृह विभागाचे अप्पर महासंचालक डाॅ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. 


रात्रगस्त पोलिसांना चहा 
राज्यात ९ मध्यवर्ती, १९ िजल्हास्तरीय अ दर्जा अाणि २३ ब दर्जा तर तीन तृतीय श्रेणी कारागृह अाहेत. यापूर्वीचा अनुभव पाहता अनेक कारागृहातून कैदी पळून गेले अाहेत. यावर उपाय म्हणून दररोज पहाटे दोन ते साडेतीन यावेळेत कारागृहात रात्रगस्त देणाऱ्या पोलिसांना प्रशासनाकडून मोफत चहा दिला जातो. हा उपक्रम देशभरातील सर्वच राज्यातील कारागृह विभागाने अवलंबण्याचे ठरविले अाहे. राज्यात दीड वर्षापासून हा उपक्रम सुरू अाहे. कैदी पळून जाण्याचे प्रमाण थांबल्याचे सांगण्यात अाले. 


कैद्यांच्या मनात अात्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न 
कैद्यांसाठी संगीत रजनी, योगा, व्याख्यान अादी उपक्रम कारागृहात नियमित सुरू असतात. गायक शंकर महादेवन, अभिनेता फरहान अख्तर, योग गुरू रामदेव बाबा असे मान्यवरांचे कार्यक्रम झालेत. त्यांच्यासोबत कैदी काही काळ घालवतात. यामुळे त्यांच्या मनात अात्मविश्वास बळावतो. जीवन जगण्याची अाशा निर्माण होते. याशिवाय गळाभेट उपक्रम सुरू झाले अाहे. कैद्यांच्या मुलांना व नातेवाईकांना दर तीन महिन्यांतून एकदा कारागृहात भेट घडवून अाणली जाते. सोबत जेवण, गप्पा, वाढदिवस अानंदाने साजरा करतात. यामुळे परिवाराचा एकोपा वाढतो. मुलांचे प्रेम मिळते. महिला कैद्यांसाठी व्हिडिअो काॅलिंग सुरू करण्यात अाले अाहे. नातेवाईकांना फोन लावताना व्हिडिअो काॅलिंग केल्यामुळे समोरासमोर बोलल्यासारखे होते. या उपक्रमामुळे अामूलाग्र बदल होतोय.

- डाॅ. भूषणकुमार उपाध्याय, अप्पर महासंचालक, कारागृह विभाग  

बातम्या आणखी आहेत...