आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खडीवरून दुचाकी घसरून एसटीला धडकली; मायलेक ठार, बहीण गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करकंब- बहिणीला पंढरपूर येथील रुग्णालयात नेताना मोटारसायकल घसरून एसटीला धडकल्याने मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला. मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात पंढरपूर-टेंभुर्णी रोडवर करकंब हद्दीत खंडोबा मंदिराजवळ गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडला. 


मृतांत दगड अकोले (ता.माढा) येथील उषा भारत गायकवाड (वय ४५) आणि भूषण भारत गायकवाड (वय २१) यांचा समावेश आहे. मोनाली भारत गायकवाड (वय १९) ही गंभीर जखमी असून तिला सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. 


मोनालीच्या पोटात दुखत असल्यामुळे तिचा भाऊ आणि आई पंढरपूरच्या रुग्णालयात दुचाकीवरून (एमएच १४ एएन २८८५) घेऊन जात होते. दुचाकी घसरून पंढरपूर-टेंभुर्णी बसवर (एमएच ०६ एस ८०८२) धडकली. त्यात मायलेकराचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच ग्रामपंचायत सदस्य सतीश माने, अनिल शिंदे यांनी घटनास्थळी मदत केली. बस चालक नागनाथ मारुती कांबळे (रा. आंबे, ता.पंढरपूर) याच्यावर करकंब पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...