आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एप्रिलमध्ये टेंडर तर मेमध्ये प्रत्यक्षात काम; स्मार्ट सिटी समितीचे आश्वासन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत लाइट अॅन्ड साऊंड शो, नाईट मार्केट आदी कामांचा आराखडा तयार असून, एप्रिलमध्ये टेंडर काढून मे मध्ये काम दिसून येईल, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी यावेळी सांगितले. उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामास यावेळी मान्यता देण्यात आली. 


स्मार्ट सिटी सल्लागार समितीची बैठक सोमवारी झाली. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले परगावी असल्याने महापालिका स्थायी समिती सभागृहात बैठक झाली. यावेळी खासदार अॅड. बनसोडे, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, परिवहन सभापती दैदिप्य वडापूरकर, महिला व बालकल्याण सभापती अश्विनी चव्हाण, नगरसेवक चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, किसन जाधव, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. ढाकणे, तपन डंके आदी उपस्थित होते. स्मार्ट सिटीच्या कामाबाबत नेमकी काय स्थिती आहे याबाबत आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला. स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शहरात स्मार्ट सिटी कामाचे उद््घाटन २०१६ रोजी झाले. अद्याप कामास गती नाही. हुतात्मा बागेत कामाचा शुभारंभ केला. त्यास परवानगीच नव्हती, आदी बाबी स्मार्ट सिटी सल्लागार समिती बैठकीत समोर आल्या. 


सोलापूर ते उजनी नवीन दुहेरी जलवाहिनीच्या ६९२ कोटींच्या कामास मान्यता देण्यात आली. याबाबत केंद्र व राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. रंगभवन ते डफरीन चौक रस्ता करण्यात येत असून, त्या कामाचा आढावा घेण्यात आला. डफरीन चौक ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत रस्ता करण्यात येत आहे. या रस्त्यावर डाॅ. बाबासाहेब जयंती मिरवणूक असते, रस्त्यावर बसवण्यात येणारी उपकरणे नादुरुस्त होणार नाही यांचे नियोजन काय? याबाबत नगरसेवक चंदनशिवे यांनी प्रश्न उपस्थित केला. इंदिरा गांधी स्टेडियम, लाइट अॅन्ड साऊंड शो, नाईट मार्केट, होम मैदान आदी कामांचा आराखडा तयार असल्याचे कंपनीचे सीईओ डाॅ. ढाकणे यांनी सांगितले. 


लोक जाब विचारत आहेत 
स्मार्ट सिटी कामाचा जाब मला नागरिक विचारू लागले, त्यामुळे मी मिटिंग लावली. याबाबत कंपनीकडून उत्तरदायित्व काय? कोण माहिती देणार, स्क्रीनवर चित्र पाहून कंटाळा आला. प्रत्यक्षात काम कधी? असे खा. बनसोडे म्हणाले. त्यावर उत्तर देताना कंपनीचे सीईओ डाॅ. ढाकणे यांनी आराखडा तयार असून मे मध्ये कामास सुरुवात झाल्याचे दिसून येईल. 


सिटीबस घेण्याचा प्रस्ताव 
शहरात स्मार्ट सिटी कंपनीकडून ५० बस घ्याव्यात, अशी मागणी परिवहन समिती सभापती दैदिप्य वडापूरकर यांनी केली. त्यावर चर्चा झाली. याबाबत सकारात्मक विचार करण्याचे ठरले. कंपनीकडून बस घ्या पण ते परिवहन ऐवजी कंपनीने चालवावे, असे मत नगरसेवक चेतन नरोटे, चंदनशिवे आणि किसन जाधव यांनी व्यक्त केले. 


किल्ला बागेत काम करण्यास हरकत 
स्मार्ट सिटी कामाचे उद््घाटन किल्ला बागेत २०१६ रोजी करण्यात आले. तेथे काम सुरू का नाही? असा मुद्दा चंदनशिवे, नरोटे यांनी विचाारला. पुरातन विभागाकडून हरकत आल्याचे उपअभियंता तपन डंके यांनी सांगितले. परवानगी न घेता उद््घाटन कसे? असे विचारले. पण त्यावर अधिकारी डंके निरूत्तर झाले. डंके यांच्या कामाबाबत खा. अॅड. बनसोडे यांनी नाराजी व्यक्त केली. 

बातम्या आणखी आहेत...