आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरावर गुरुवारनंतर आफत, तीनच दिवस पुरेल जलसाठा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरासाठी उजनी धरणातून पाणी अद्याप सोडलेले नाही. टाकळी येथील जॅकवेलला पाच फूट पाणी आहे. यापुढे तीन दिवस सुरळीतपणे पुरेल इतका पाणीसाठा आहे. दरम्यानच्या काळात उजनीतून पाणी नाही सोडल्यास गुरुवारनंतर शहरावर जलसंकट येण्याची शक्यता आहे. त्याचे परिणाम तीनऐवजी चार दिवसांआड किंवा अवेळी पाणी पुरवठा सोसण्याची पाळी सोलापूरकरांवर येणार आहे. 


महापालिका आयुक्तांनी सांगितले होते की, मुख्यमंत्र्यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले. पण अद्याप पाणी सोडलेले नाही. टाकळी पंप हाऊस येथे पाच फूट पाणी आहे. ते पाणी २० तारखेपर्यंत पुरेल. पण पाण्याची पातळी तीन फूट चार दिवसात होईल. काही काळ पंप बंद पडतील. त्यामुळे उपसा कमी होईल. शहरात रात्रीचे किंवा तीन एेवजी चार दिवसांआड पाणीपुरवठा हिवाळ्यातच होण्याची शक्यता आहे. आठवड्यात औज बंधाऱ्यात पाणी येणे आवश्यक आहे. त्यासाठी उजनीतून सात हजार क्युसेकने पाणी सोडावे लागणार आहे. 


डिसेंबर २०१५ ते नोव्हेंबर २०१७ पर्यंत उपशाप्रमाणे रक्कम ५.४८ कोटी रुपये देणे आहे. महापालिकेकडून आॅगस्ट २०१७ पर्यंत १७.४० कोटी देण्यात आले आहे. यातून देणेपोटी ५.४८ कोटी वजा केल्यास ११.९२ कोटी शिल्लक आहे. मागितलेली ५३ कोटींची रक्कम चुकीची आहे. टाकळी येथे १९ जानेवारीपर्यंत पुरेल इतके पाणी आहे. वेळेत पाणी न पोहचल्यास शहरात जनक्षोभ होईल. त्यामुळे तातडीने पाणी सोडण्याची मागणी महापालिकेने केली आहे. 


दुहेरीचा प्रस्ताव 
उजनी ते सोलापूर नवीन जलवाहिनी घालण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने ६९२ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. तो मंजुरीसाठी महापालिका सभागृहाकडे आयुक्तांनी पाठवला आहे. जानेवारीच्या सभेतील पुरवणीत हा विषय येण्याची शक्यता आहे. एनटीपीसीकडून येणारे २५० कोटी, स्मार्ट सिटी कंपनीकडून २०० कोटी अशी रक्कम तरतूद आहे. कमी पडणाऱ्या २४२ कोटींची तरतूद राज्य सरकार अनुदान किंवा बिनव्याजी कर्जातून करेल, अशी अपेक्षा आहे. 

बातम्या आणखी आहेत...