आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६ वर्षांत २०० कोटी रुपये खर्च, पाणीपुरवठ्यात सुधारणा नाहीच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी सकाळी येणारे पाणी दुपारपर्यंत आले नव्हते. शहरास चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज ४० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची गरज असते. वास्तवात रोज ९० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. त्यातून चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे आणि तेही सुरळीत नाही. 

 

महापालिका अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, आहे तसे पाणी घ्या. वीजपुरवठा खंडित आहे. आम्ही काय करणार? शहरात पाणीपुरवठा विस्कळीत असताना, पदाधिकारी काहीच उपाययोजना करत नाहीत. कामे मिळवण्यात रस दाखवणारे पदाधिकारी पाण्यासाठी पुढे सरसावत नाहीत, अशी स्थिती आहे. मे महिन्यात पाण्याची समस्या उद्भवते असे कारण पुढे करण्यात येत आहे. मागील सहा वर्षात पाणीपुरवठा सुधारण्यासाठी २०० कोटी खर्च केले पण वितरण व्यवस्थेत सुधारणा होत नाही. 


शहरात चार ते सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. कुंभारवेस परिसरात सहा दिवसांपासून पाणी नाही. विडी घरकुल परिसरात सहा दिवसांआड पाणी दिले जाते. जुळे सोलापुरात चार दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. नगरसेवक संतोष भोसले यांच्या प्रभागात सकाळी येणारे पाणी दुपारपर्यंत आले नव्हते. विजापूर रोड परिसरातही पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. 


दोन दिवसांआड पुरवठा करणे शक्य 
शहरास पाण्याची गरज उपलब्धता आणि गळतीचे प्रमाण यावर महापालिका सभागृहात वारंवार गणित मांडले. पण महापालिका अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पाण्याची गळती काढून, उपलब्धता करणे आवश्यक असताना वीज मंडळाकडे बोट दाखवले जात अाहे. १० लाख लोकसंख्येस पाच दिवसांचे पाणी देण्यासाठी ४० एमएलडी पाण्याची गरज असते. उजनी आणि टाकळी येथून रोज ९० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध असताना चार दिवसांआड पाणीपुरवठा का? या पाण्यातून दोन दिवसांआड पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. तसे न करता तीन दिवसांआडही पाणी दिले जात नाही. वितरण व्यवस्थेच्या त्रुटी पुढे केल्या जात आहेत. ते दूर करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. जनतेला कारणे सांगणे नाही. 


पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज 
शहरात पाणीपुरवठ्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी लक्ष देऊन बैठक घेण्याची गरज आहे. महापालिका निवडणुकीत पालकमंत्री व सहकारमंत्र्यांनी शहरातील नागरिकांना पाण्यासाठी शब्द दिलेला आहे. त्यांनी महापालिका पदाधिकाऱ्यांना जबाबदार न धरता बैठक घेण्याची गरज आहे. 


दोन टाक्या रोजच कशा भरतात ? 
कस्तुरबा मंडई व दयानंद काॅलेज येथील पाण्याची टाकी रोज भरली जाते. तेथे तितक्या पाण्याची गरज आहे? इतर टाक्या रोज भरल्या जात नाही. याबाबत तांत्रिक तपासणीची मागणी सत्ताधारी नगरसेवकांनी केली. 


शुक्रवारी बैठक घेणार 
शुक्रवारी महापालिका अधिकारी व पदाधिकारी सोबत बैठक घेऊन माहिती घेतली जाणार आहे. पाणी असताना दिले का जात नाही. ३ दिवसाआड तरी सुरळीत होणे आवश्यक. विजयकुमार देशमुख, पालकमंत्री 


सहा वर्षात २०० कोटी खर्च नगरोत्थान योजना - ७२ कोटी, टाकळी १.६ किमी जलवाहिनी दुरूस्ती - ५.५ कोटी, पंपीग मशिनरी बदलणे - १४ कोटी, मुख्यमंत्री विशेष निधीतून जलवाहिनी - २२ कोटी, भांडवली व वार्डवाईज निधीतून कामे - १२० 
 

बातम्या आणखी आहेत...