आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमसंबंधातून महिलेचा चाकूने वार करून खून; मुल्लाबाबा टेकडी परिसरातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- प्रेमसंबंधातून चाकूने वार करून एका महिलेचा खून करण्यात आला. मंगळवारी सकाळी सिद्धेश्वर पेठ, लक्ष्मी मंडईजवळील मुल्लाबाबा टेकडी येथे ही घटना घडली. 


बिलकीस इक्बाल शेख (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे. महेबूब ऊर्फ फिरोज चांदसाब जमादार (वय ३२) याला शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी मृत बिलकीस यांची जाऊ फैमिदा अन्सारी यांनी फिर्याद दिली आहे. फैमिदा आपल्या सासूसह मुल्लाबाबा टेकडी येथे राहण्यास आहेत. पतीशी पटत नसल्याने मृत बिलकीस या काही वर्षापासून माहेरीच राहत होत्या. त्यांना दोन मुले आहेत. मृत बिलकीसचे त्याच भागात राहणाऱ्या महेबूब यांच्याशी प्रेमसंबंध होते. घटनेच्या आदल्यादिवशी आरोपी मेहबूब हा बिलकीसच्या घरी आला होता. त्याने फैमिदाचा मोबाइल हिसकावून नेला. 


या प्रकरणावरून बिलकीस व महेबूब यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १३ फेब्रुवारीला सकाळी साडेसहा वाजता बिलकीस हिचा ओरडण्याचा आवाज आला. फैमीदा यांनी जाऊन पाहिले तर बिलकीस या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. महेबूब पळून जाताना दिसला. त्याला आवाज दिला पण तो न ऐकता तो तसाच पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार चावडी पोलिसात नोंद झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...